सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील उपेंद्रनगर भाजी मार्केट येथे लाल रंगाचे स्वेटर परिधान केलेल्या एकाने पाचशे रुपयांच्या नकली नोटा बाजारात आणून त्या भाजी विक्रेत्यांना दिल्या. फक्त २० ते ३० रुपयांचीच भाजी विकत घेत उर्वरित पैसे स्वतःच्या ताब्यात घेत पुढे जाऊन घेतलेला भाजीपाला एका कानाकोपऱ्यात फेकून देत येथून पलायन केले. (500 fake notes in circulation in CIDCO in Upendra Nagar area Nashik Fake Currency Crime)
येथील भाजी विक्रेते सोनू जाधव या विक्रेत्याची फसवणूक झाली. पाचशे रुपयाची नकली नोट देत एकाने भाजीपाला विकत घेतला. थोड्यावेळाने जाधव यांनी नोट निरखून बघितली असता ही नोट साध्या कागदावर कलर झेरॉक्स करून एकमेकांना चिपकवलेली असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तिचा शोध घेतला असता तो तेथून फरार झालेला होता.
त्यांच्याकडून घेतलेला भाजीपाला दुकानाच्या थोड्या अंतरावर फेकूनही दिलेला त्यांना दिसून आला. यानंतर ही व्यक्ती पवननगर किंवा बाकी ठिकाणी बाजारात जाऊ शकतो या अनुषंगाने जाधव यांनी ही बाब परिचित लोकांना तात्काळ कळवत असा व्यक्ति निदर्शनास आल्यास त्यास लागलीच पोलिसांच्या स्वाधीन करावे किंवा पोलिसांना सूचित करावे असे आवाहनही केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.