NMC News: महापालिकेच्या जागेवर 500 मोबाईल टॉवर उभारणार

Mobile Tower
Mobile TowerEsakal
Updated on

NMC News : खासगी इमारतींवरील मोबाईल टॉवर मोजण्याबरोबरच कर लावताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता तसेच उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने महापालिकेकडून स्वमालकीच्या जागेवर मोबाईल टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शहरात ५०० मोबाईल टॉवर उभारण्याचे नियोजन आहे. (500 mobile towers on municipal premises nashik news)

शहराचा विस्तार वाढत असताना मूलभूत गरजांपैकी आता महत्त्वाची गरज म्हणून मोबाईल व नेटवर्कचे महत्त्व वाढले आहे. परंतु मोबाईल टॉवरच्या अपुऱ्या संख्येमुळे नेटवर्क मिळतं नाही. दुसरीकडे शहरात जवळपास ८०६ मोबाईल टॉवर असून त्यातील परवानगी घेतलेल्या मोबाईल टॉवरची संख्या अत्यल्प आहे.

मोबाईल टॉवर संदर्भात शासनाने नियमावली केली नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाला नोटीस पाठविण्यापलिकडे अधिक अधिकार नाही. नोटीस पाठविल्यानंतर अधिकृत टॉवरसाठी २४० प्रस्ताव दाखल झाले. त्यातील १६७ मोबाईल टॉवर नियमित करण्यात आले. परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवरचे नियमितीकरण नाही. दुसरीकडे न्यायालयाने टॉवर सील करण्याची परवानगी नाही.

Mobile Tower
NMC News: मनपाकडून 451 दिव्यांगांना मिळणार 'इतके' अर्थसाहाय्य

पहिल्या टप्प्यात ३० टॉवर

पंधराव्या वित्त आयोगाने महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उत्पन्न वाढविण्याचा भाग म्हणून महापालिकेकडून स्वमालकीच्या जागेवर ५०० मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रस्ताव आहे. उत्पन्न वाढविण्याबरोबरच ‘फाइव्ह जी’ सेवा नागरिकांना मिळाली पाहिजे, असाही दावा करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात ३० मोबाईल टॉवरला परवानगी देण्याचे नियोजन आहे. मोबाईल टॉवर उभारणीनंतर प्रतिसाद लक्षात घेऊन मोबाईल टॉवर उभारले जाणार आहे. त्यानंतर खासगी इमारतींवरील मोबाईल टॉवर टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहे.

"महापालिकेच्या मिळकती तसेच स्वमालकीच्या जागांवर ५०० मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात ३० मोबाईल टॉवर साठी जागा दिल्या जाणार जातील. यातून वार्षिक २२ कोटी रुपयांची उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे." - श्रीकांत पवार, कर उपायुक्त.

Mobile Tower
Nashik News: ‘टाकळी’च्या चिमुकल्यांची मुंबई दर्शन सहल ठरली अनोखी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()