Nashik COVID Update : कोरोना नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ५१ संशयितांच्या चाचण्या केल्या. त्यात सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याने तूर्त नाशिककरांची कोरोनातून सुटका झाली आहे.
मात्र, असे असले तरी वैद्यकीय विभागाने सावधगिरीचा सल्ला दिला आहे.(51 tests of Corona are negative at civil hospital nashik news)
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला सध्या राज्य सामोरे जात आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व त्र्यंबकेश्वरमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरी भागात संशयितांचे नमुने घेण्यास सुरवात केली. मागील सहा दिवसात ५१ संशयितांच्या अॅन्टिजेंट चाचण्या करण्यात आल्या.
त्या सर्वांचे अहवाल महापालिकेला प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती केली आहे.
टास्क फोर्सकडून राज्यभरात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. २८) डॉ. गंगाखेडकर यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नाशिक महापालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या.
नागरिकांना मास्क वापरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे व जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वृद्ध व आजारी व्यक्तींना बाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.