Nashik MNS News : ‘मनसे’कडून 51 हजार बुंदी लाडूंची मेजवानी! तयारी रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापनाची

भाजपच्या सत्ताकाळात अयोध्येत श्री राममंदिराची उभारणी होत असल्याने त्या पक्षाकडून उद्‌घाटनाची जोरदार तयारी होत असताना अन्य पक्षदेखील मागे नाही.
51 thousand Bundi laddu feast from MNS Preparation for installation of ayodhya mandir Ram Lalla idol
51 thousand Bundi laddu feast from MNS Preparation for installation of ayodhya mandir Ram Lalla idolesakal
Updated on

नाशिक : भाजपच्या सत्ताकाळात अयोध्येत श्री राममंदिराची उभारणी होत असल्याने त्या पक्षाकडून उद्‌घाटनाची जोरदार तयारी होत असताना अन्य पक्षदेखील मागे नाही. शिवसेनेबरोबरच नाशिकमध्ये काँग्रेसकडूनदेखील महाआरती होणार आहे.

आता त्याचबरोबर मनसेकडून राममंदिर उद्‌घाटनाच्या दिवशी शहरात ५१ हजार लाडूंचे वाटप होणार आहे.

त्यासाठी पक्षाच्या बैठका होतात त्या ठिकाणी लाडू तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, पक्षाचे पदाधिकारी लाडू तयार करण्याच्या कामाला हातभार लावत आहे. (51 thousand Bundi laddu feast from MNS Preparation for installation of ayodhya mandir Ram Lalla idol Nashik political News)

सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथे होणार असून त्यानिमित्ताने नाशिक शहरात व जिल्ह्यात ५१ हजार लाडूवाटप होणार केले जाणार आहे. लाडू तयार करण्याच्या कामाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात सुरवात झाली.

मनसेची स्थापना झाल्यानंतर सुरवातीला मराठी हा पक्षाचा अजेंडा होता. त्याचबरोबर स्थानिक प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलने झाली. मराठी पाट्या हा महत्त्वाच्या आंदोलनात मनसेला यश मिळाले. टोल नाक्यांवरील लूटमार थांबली.

राजकारणाचे वारे बदलत असताना पक्षाने कुस बदलली, त्यात हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला. मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी आंदोलने झाली. भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून मंदिरांमध्ये महाआरतीची घोषणा करण्यात आली.

हिंदुत्वाचा अजेंडा पुढे चालविण्यासाठी अयोध्येतील राममंदिर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताची संधी चालून आली. त्यामुळे ५१ हजार लाडू वाटपाचे काम हाती घेण्यात आले.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी सभागृह नेते सलीम शेख, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, बंटी लभडे, नितीन माळी, साहेबराव खर्जुल, योगेश दाभाडे, धीरज भोसले, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे, सचिन सिन्हा, गणेश कोठुळे, संतोष कोरडे, अमित गांगुर्डे ,संजय देवरे, ज्ञानेश्वर बगडे, महिला सेना जिल्हाध्यक्ष पद्मिनी वारे, कामिनी दोंदे, शहराध्यक्ष अक्षरा घोडके यांच्या उपस्थितीत लाडू तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. दोन दिवसात लाडू तयार करून वाटप केले जाणार आहे.

51 thousand Bundi laddu feast from MNS Preparation for installation of ayodhya mandir Ram Lalla idol
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य प्राण प्रतिष्ठापना; १०८ ज्योतींनी श्री थाडेश्वरी मंदिरात होणार अभिषेक

कार सेवकांचा सत्कार

राममंदिर उद्‌घाटनाच्या दिवशी मनसेच्या वतीने पक्षाच्या शहर कार्यालयात ५१ हजार लाडू वाटप होणार आहे. त्याचबरोबर मनसेकडूनही श्री काळाराम मंदिरात महाआरती होणार आहे.

त्यापूर्वी रविवारी (ता. २१) सांयकाळी पाच वाजता पक्षाच्या कार्यालयात कारसेवकांचा व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.

"अयोध्येत राममंदिर उद्‌घाटन व मुर्ती प्रतिष्ठापना हा समस्त हिंदूसाठी उत्सव आहे. या उत्सवात मनसे सहभागी होणार आहे. उत्सवात ५१ हजार लाडूंचे महाप्रसाद वाटप होणार आहे तर कारसेवकांचा सत्कार होईल."- सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे.

51 thousand Bundi laddu feast from MNS Preparation for installation of ayodhya mandir Ram Lalla idol
Ayodhya Ram Mandir च्या खाली गाडलं जाणारं टाईम कॅप्सुल, नेमकं आहे काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.