Nashik News : नाशिक विभागात 518 बॉयलरची नोंद; जिल्ह्यात सर्वाधिक बॉयलर

नाशिक विभागातील सर्व औद्यागिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमध्ये ५१८ बॉयलरची नोंद बाष्पके विभागात करण्यात आली आहे.
industry ( file Photo )
industry ( file Photo )esakal
Updated on

Nashik News : नाशिक विभागातील सर्व औद्यागिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमध्ये ५१८ बॉयलरची नोंद बाष्पके विभागात करण्यात आली आहे. यात सर्वांत मोठ्या बॉयलरची नोंद ही भुसावळ येथील ५०० मेगावॉट थर्मल पॉवर प्रकल्पात आहे.

दरम्यान, काही वर्षांपासून औद्योगिक वसाहतीमध्ये तपासणी होत नसल्याने अनेक कंपन्यांमध्ये नेमके काय चालते, याची कुठल्याच प्रकारची माहिती ही विभागाला मिळत नव्हती. (518 boilers recorded in Nashik division companies located in industrial colonies nashik news)

यात कंपनीत अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडल्यास शासकीय यंत्रणेवर खापर फोडले जाते. बॉयलर वापरणाऱ्या उद्योगासाठी बॉयलर कायदा १९२३ आणि २००७ मधील अधिसूचनेनुसार बाष्पके विभागात नोंदणी करणे व त्याची दर सहा महिन्यांत तपासणी करून घेणे कंपनीस बंधनकारक असते. यातच समजा एखाद्या कंपनीने विनापरवानगी बॉयलर सुरू ठेवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते.

या उद्योगांमध्ये वापर

खासकरून बॉयलरचा वापर टेक्स्टाइल, पॉवर, केमिकल, फार्मा, फूड प्रोसेसिंग, साखर उद्योगात केला जातो.

industry ( file Photo )
Nashik News : 8 अव्वल कारकून बनले नायब तहसीलदार! उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या

हरित लवादकडून बंदी

कंपन्यांमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये पूर्वी फर्नेस ऑइल इंधनाचा वापर केला जात होता. पण या ऑइलच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होत होता. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी हरित लवादने बॉयलर असणाऱ्या कंपन्यांना फर्नेस ऑइल वापरण्यावर बंदी घातली आहे.

४१ नवीन बॉयलरची नोंद

विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांत एकूण ५१८ उद्योगांत बॉयलरची नोंद करण्यात आली आहे. या वर्षी त्यात ४१ नवीन बॉयलरची भर पडली आहे. यात जळगावमध्ये १७९, तर धुळ्यात ११४ आहेत. नंदुरबारमध्ये ३५ बॉयलरची नोंद आहे.

industry ( file Photo )
Nashik News : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी राज्यातील उद्योगांची क्षमता तपासणार : डॉ. व्ही. के. राय

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये १७० बॉयलरची नोंदणी करण्यात आली आहे. येणारा काळात मालेगावमधील टेक्स्टाइल उद्योगातील भरभराटी पाहता हा आकडा दुपटीने वाढणार असल्याचे संकेत बाष्पके विभागामार्फत देण्यात आले आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तुटवडा

विभागातील बॉयलरच्या नोंदी तसेच तपासणी करण्याची जबाबदारी बाष्पके विभागाची आहे. चारही जिल्ह्यांसाठी नाशिक शहरात एकच कार्यालय असून, या कार्यालयात सहसंचालक, लिपिक आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. इतर जिल्ह्यांत अधिकारी अथवा कार्यालय नाही.

''बॉयलर कायदा १९२३, २००७ मधील अधिसूचनेनुसार बाष्पके विभागात नोंदणी करणे बंधनकारक आहे. विनापरवाना बॉयलर सुरू असल्याचे आढळून आल्यास अथवा तक्रारी आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.''- एस. एल. कुंभलवार, सहसंचालक

industry ( file Photo )
Nashik News : ...अन् अचानक बसथांबा गायब झाल्याने नागरिक आश्चर्यचकित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.