कृषी उडान योजनेत देशातील 53 विमानतळांचा समावेश

PM krushi udaan yojana latest marathi news
PM krushi udaan yojana latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : कृषी उडान योजनेंतर्गत (Krushi Udaan Yojana) देशातील ५३ विमानतळे (Airports) जोडली आहेत. विमानतळाची निवड प्रामुख्याने ईशान्य क्षेत्रावर केंद्रित करण्यात आली. याव्यतिरिक्त योजनेत उत्तर, संपूर्ण पश्चिम किनारा आणि दक्षिण भारत (२ बेटांसह) समावेश केला आहे. (53 airports in country included in Krishi Udan Yojana nashik Latest Marathi News)

शेतमाल साठून राहिल्यास त्याचे नुकसान होते. त्यामुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे, योग्यवेळी शेतमाल बाजारात नेण्याच्या योजनेत नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य, आदिवासी व्यवहार मंत्रालय, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय यांचा समावेश आहे.

योजनेचा शेतकरी व उत्पादक कंपन्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, की मागणी असलेल्या प्रदेशात व देशात शेतमालाचा पुरवठा करून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी सरकारने २०२० मध्ये ‘कृषी उडान योजना २’ सुरू केली.

योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादन, फलोत्पादन, मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, तसेच मांस यांसारख्या व्यवसायासंबंधीची विमानाने वाहतूक करणे सोपे होणार आहे.

PM krushi udaan yojana latest marathi news
अतिवृष्टीमुळे नाशिक विभागाच्‍या 60 बसफेऱ्या झाल्‍या रद्द

नाशिक विमानतळावर पायाभूत सुविधा

‘हब’ आणि ‘स्पोक मॉडेल’ व मालवाहतूक ‘ग्रीड’ विकसित करून ही योजना कार्गो संबंधित पायाभूत सुविधांना समर्थन देणार आहे.

उत्तर-पूर्व विभाग, आदिवासी आणि डोंगराळ जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून बागडोगरा आणि गुवाहाटी विमानतळ, लेह, श्रीनगर, नागपूर, नाशिक, रांची आणि रायपूर विमानतळावर ‘एअरसाइड ट्रान्झिट’ आणि ‘ट्रान्स- शीपमेंट’ पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

योजना लाभासाठीची कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार देशात कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकरी असल्यास त्याला योजनेचा लाभ होईल. त्यासाठी त्याने शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवणे बंधनकारक आहे.

अर्जासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक, रहिवासी दाखला आवश्यक आहे. योजनेसाठी ‘ई-कुशल’ नावाने ऑनलाइन पोर्टल कृषी उडान २ चा भाग म्हणून विकसित होणार आहे. पार्टलद्वारे योजनेचे समन्वय, देखरेख आणि मूल्यमापन करण्यात येणार आहे, असेही श्री. सोनवणे म्हणाले.

PM krushi udaan yojana latest marathi news
NMC करणार 1 लाख वृक्षांचे रोपण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.