Nashik : मागील वर्षाच्या तुलनेत 53 टक्के अधिक साठा

water stock reference image
water stock reference imagesakal
Updated on

नाशिक : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. १७) विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी (ता. १८) पुन्हा संततधार पावसाने (Rain) हजेरी लावली. त्यामुळे दुपारनंतर विविध धरणातील विसर्ग वाढविला गेला.

पश्चिम पट्ट्यातील तालुके आणि धरणाचे पाणलोट क्षेत्र हेच संततधार पावसाचा केंद्रबिंदू राहीला. दरम्यान, जुलैत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ५३ टक्के अधिक पाणीसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

शहरासह जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस सुरू झाला आहे. जून व जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यात जास्त पाऊस झाला आहे. दिंडोरी तालुक्यात विक्रमी पाचशे टक्के पाऊस झाला आहे.

अनेक वर्षांत जिल्ह्यात सरासरी इतका पाउस झाला. मात्र, जून व जुलै महिन्यात मात्र पावसाचा वेग कमी राहीला. यंदाच्या हंगामत मात्र जुलै महिन्यातच मुसळधार पाऊस झाला. जायकवाडी धरणात ७५ टक्केच्या आसपास पाण्याचा विसर्ग सोडला गेला.

शिवाय जिल्ह्यातील धरणात सध्या स्थितीला ७६ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. प्रत्येक तालुक्यात जुलैच्या सरासरीच्या शंभर टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील धरणात गेल्या वर्षी अवघा २३ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्या तुलनेत ५३ टक्के अधिक म्हणजे ७६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. याशिवाय हवामान विभागाने आठवडाभर पुन्हा संततधार पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने यंदाच्या मोसमात जुलै महिन्यातच जिल्ह्यातील धरणात १०० टक्के पाणीसाठा होईल, असा अंदाज आहे.

water stock reference image
NMC करणार 1 लाख वृक्षांचे रोपण

धरणातील विसर्ग (सायंकाळी सहापर्यंत)

-दारणा : ४०३४ क्यूसेक

-गंगापूर : १३७७

वालदेवी : ६४७

आळंदी : ४४७

भोजापूर : ५४० क्यूसेक

water stock reference image
कृषी उडान योजनेत देशातील 53 विमानतळांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.