Nashik Crime News : बनावट स्टेटमेंटद्वारे बँकेला 54 लाखांचा गंडा

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : शहरातील एका खासगी बँकेच्या एजंटने कर्जदारांशी संगनमत करून कर्जप्रकरण मंजूर करून बँकेला तब्बल ५४ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (54 lakh extorted from bank through fake statement nashik Crime News)

प्रमोदकुमार ओमकारेश्वर अमेटा (रा. आशानगर, कांदिवली (पूर्व), मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, मायको सर्कल येथील आयडीएफसी फर्स्ट बँक शाखेत २ मार्च ते ३० नोव्हेंबर २०२२ यादरम्यान, संशयित योगेश नाना पाटील (२७, रा. आबाड रेसिडेन्सी, तळवाडे रोड, ता. चांदवड, जि. नाशिक) याने बँकेकडील अधिकृत एजंटाचे काम करताना ग्राहकांना गृह व वैयक्तिक कर्जांची प्रकरणे मंजूर करून देत होता.

त्याने गणेश फकिरा सांगळे, सूर्यकांत पंढरीनाथ वाघुळे, ताई पांडुरंग पगारे, योगेश सुकदेव काकड, सुरेखा सुकदेव गायकवाड, नंदू देवराम काळे व स्वाती प्रवीण शिरसाट या ग्राहकांकडून त्यांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेऊन बँकेचे बनावट स्टेटमेंट तयार केले.

प्रत्येकाचे ६ ते ९ लाखांपर्यंतची कर्जप्रकरणे मंजूर करून दिले. ते पैसे कर्जदारांच्या बँक खात्यात आले असता योगेश पाटील याने ग्राहकांना प्रकरणांची कागदपत्रे व फाइल अपूर्ण राहिल्याचे सांगून सातही कर्जदारांकडून कर्जाची रक्कम स्वत:च्या बँक खात्यात मागवून घेतली.

Crime News
Jalgaon Crime News : वडनगरीतील कथित उच्च वर्णीयांविरुद्ध Atrocity दाखल

दरम्यान, बँकेने दिलेले कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया सुरु केली असता, या सातही कर्जदारांनी रक्कम पाटील यांच्या बँक खात्यात टाकल्याचे सांगितले. यातून बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

गुन्हा दाखल करून तपास सुरु केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांनी दिली असून यात एजंट पाटील व कर्जदारांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे आढळून येत आहे. चौकशी सुरु असून लवकरच संशयितांना अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

संशयितांना मंजूर झालेले कर्ज :

गणेश सांगळे : ७ लाख ४ हजार २८२ रुपये.
सूर्यकांत वाघुळे : ८ लाख ७ हजार ४७८
ताई पगारे : ७ लाख २७ हजार ३८६
योगेश काकड : ६ लाख ९१ हजार ७८७
सुरेखा गायकवाड : ७ लाख ७५ हजार ४०७
नंदू काळे : ९ लाख ९ हजार ३४१
स्वाती शिरसाट : ७ लाख ९१ हजार १८१

Crime News
Satara Crime News: जावळीत अवैध व्‍यावसायिकांचे धाबे दणाणले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.