Nashik Crime: मनमाडला FCIच्या गोदामातून 55 पोते तांदळाची चोरी

Godown of Food Corporation of India.
Godown of Food Corporation of India.esakal
Updated on

Nashik Crime : आशिया खंडातील सर्वात मोठे धान्याचे गोदाम असलेल्या मनमाड शहरातील भारतीय खाद्य निगम अर्थात एफसीआयच्या गोदामातून ५० किलो वजनाचे ५५ तांदळाचे पोते अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरटे आत घुसून धान्य चोरून नेत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी सुनील चिखलीकर यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (55 sacks of rice stolen from Manmad FCI godown Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Godown of Food Corporation of India.
Jalgaon Crime News : खुनाच्या घटनांनी चाळीसगाव हादरले! वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून

मनमाड येथे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे मोठे गोदाम आहे. रेल्वे वाघळीद्वारे परप्रांतातून आलेले धान्य मनमाडचा गोदामात साठवणूक केली जाते. येथून त्याचे वितरणही केले जाते.

मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय अन्न महामंडळ गोदाम परिसरातील गोडाऊन क्रमांक १०२ मध्ये ही धाडसी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी गोडाऊनच्या शटर उचकटून गोदामातील तांदळाचे ५५ पोते (अंदाजे २७ क्विंटल, अंदाजे १० हजार २९० रुपये किमत) तांदूळ चोरून नेला.

दरम्यान भारतीय खाद्य निगमच्या परिसरामध्ये २४ तास मोठा बंदोबस्त असताना कसा काय चोरीला गेला? याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे. भारतीय खाद्य निगमला गेल्या तीन वर्षापासून कंत्राटी सुरक्षा रक्षक आहेत.

Godown of Food Corporation of India.
Jalana Crime : डुकरे नेण्यावरून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()