Nashik Illiteracy Rate: नाशिक जिल्ह्यात 56 हजार निरक्षर; कसमादे पट्ट्यात सर्वाधिक प्रमाण

Illiteracy Survey
Illiteracy Survey Sakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Illiteracy Rate : राज्यात मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्हा विकसित होत असला, तरी जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात ५६ हजार निरक्षर असल्याचे समोर आले आहे. यात कसमादे पट्ट्यातील तालुक्यांमध्ये सर्वाधिक निरक्षरणाचे प्रमाण आहे.

या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम’ हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत पुढील वर्षभरात या निरक्षरांना १०० टक्के साक्षर केले जाणार आहे. (56 thousand illiterates in Nashik district news)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार २०३० पर्यंत सर्व तरुण, प्रौढ, पुरूष आणि महिला अशा सर्वांनी १०० टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करण्याबाबत नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

केंद्र शासन पुरस्कृत, ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम’ २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी शासनाकडून २०११ च्या जनगणनेनुसार निरक्षरांची यादी जिल्ह्याला पाठविली आहे. यात पहिल्या टप्प्यात ५६ हजार ५०६ निरक्षर आहेत. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक, तर, देवळा तालुक्यात सर्वांत कमी निरक्षर आहेत.

शासनाच्या निर्देशानानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत योजना विभागाकडून अभियानाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अभियानाची अंमलबजावणी सुरवात होणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात शासनाकडून २०२३-२४ मध्ये त्याच्या अंमलबजावणीस सुरवात झाली आहे. या दोन आर्थिक वर्षासाठी ५६ हजार ५०६ हा लक्षांक निश्चित केला आहे.

यात २३ हजार ६१२ पुरुष, तर ३२ हजार ८९४ महिलांचा समावेश आहे. दोन वर्षांतील प्रत्येकी २८ हजार २५३ चा लक्षांक एकाच वर्षात पूर्ण करावा लागणार आहे. अभियानाकरिता विभागाने जिल्ह्यामध्ये विभाग स्तरावर गट गटशिक्षणाधिकारी-शिक्षणाधिकारी यांची कार्यशाळा पार पडली असून, प्रत्येक महसुली गावाला दोन्ही वर्षांचे उद्दिष्ट तसेच तालुक्याचे उद्दिष्टही निश्चित करून दिले आहे. जिल्हास्तरावर तालुकास्तरावर नियमक परिषद व कार्यकारी समितीचे गठन केले आहे.

Illiteracy Survey
Eknath Shinde: महापालिकेच्या निवडणूका घ्या, मग राजस्थानात प्रचाराला जा, ठाकरे गटाच्या नेत्याचे CM शिंदे यांना आव्हान

शाळास्तरावर शाळा हे एकक असल्याने समितीचे गठन करण्यात आले आहे. सर्वेक्षक यांनी केलेल्या सर्वेमध्ये आढळून आलेल्या निरक्षणांची ऑनलाइन नोंदणी करण्याचे कामकाज गट स्तरावर सुरू असून, यात आतापर्यंत नऊ हजार ७०२ नवसाक्षरांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यानंतर, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण होईल. परंतू, तत्पूर्वी स्वयंसेवकांकडून नोंदणी झालेल्या ठिकाणी गावात वर्ग सुरू केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) भगवान फुलारी यांनी दिली.

गटाचे नाव २०२२-२३ २०२३-२४

बागलाण २००४ २००४

चांदवड १०८७ १०८७

देवळा ६७३ ६७३

दिंडोरी १६८० १६८०

इगतपुरी १३४५ १३४५

कळवण १३९२ १३९२

मालेगाव ४५१६ ४५१६

नांदगाव १४११ १४११

Illiteracy Survey
Sakal Exclusive: सुरक्षित मातृत्वासाठी 600 सुमन संस्थांचा आधार! आरोग्य विभागाने कसली कंबर

नाशिक ६१०३ ६१०३

निफाड २१४० २१४०

पेठ ७६४ ७६४

सिन्नर १५६४ १५६४

सुरगाणा १२०५ १२०५

त्र्यंबकेश्वर ११३४ ११३४

येवला १२३५ १२३५

एकूण २८२५३ २८२५३

आतापर्यंत झालेली नवसाक्षर नोंदणी

त्र्यंबकेश्वर (१०९७), इगतपुरी (१०३५), पेठ (४७३), चांदवड (६१९), नाशिक (३३०६), बागलाण (८०२), येवला (४३३), निफाड (६२२), दिंडोरी (४४२), सुरगाणा (२६१), सिन्नर (२१९), नांदगाव (१८६), देवळा (५३), मालेगाव (१५०), कळवण (४).

Illiteracy Survey
Nashik News: निरोप समारंभात आयुक्त शिंदे भावुक; अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.