Nashik Agriculture News : कृषी अन्नप्रक्रिया निर्यातीत एप्रिलमध्ये 564 कोटींची घट

Agriculture Department
Agriculture Departmentesakal
Updated on

Nashik News : कृषी अन प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीची एप्रिल २०२२-२३ च्या तुलनेत एप्रिल २०२३-२४ ची स्थिती ‘अपेडा'तर्फे स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये ५६४ कोटींनी निर्यात घटली आहे.

गतवर्षीच्या एप्रिलमध्ये १४ लाख ७२ हजार ७९० टन गव्हाच्या निर्यातीतून ३ हजार ६०२ कोटींचे परकीय चलन मिळाले होते. यंदा एप्रिलमध्ये मात्र १ हजार ६३१ टन गव्हाच्या निर्यातीतून ४ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे.

देशातून एप्रिल ते मार्च या वर्षभराच्या कालावधीत कृषी अन प्रक्रिया केलेल्या अन्नाची निर्यात २०२१-२२ मध्ये १ लाख ८३ हजार २५० कोटींची झाली होती.(564 crore decline in agro food processing exports in April Nashik Agriculture News)

ही निर्यात २०२२-२३ मध्ये २ लाख १४ हजार ४३० कोटींची झाली होती. यंदाच्या एप्रिलमध्ये पशूधन उत्पादने, तृणधान्य, इतर तृणधान्य, काजू निर्यातीतून कमी परकीय चलन मिळाले आहे. काजूची गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये २५६, तर यंदाच्या एप्रिलमध्ये २३२ कोटींची निर्यात झाली आहे.

इतर तृणधान्यांची निर्यात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ६८५ कोटींची, तर यंदाच्या एप्रिलमध्ये ५२१ कोटींची निर्यात झाली. तृणधान्यांची निर्यात गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये १० हजार ४३२ कोटींची, तर यंदाच्या एप्रिलमध्ये ८ हजार ७२९ कोटींची झाली आहे.

पशूधन उत्पादनांची निर्यात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये २ हजार ९१९ कोटींची, तर यंदाच्या एप्रिलमध्ये २ हजार ७९० कोटींची झाली. पशूधन उत्पादनांमध्ये म्हशीचे मांस, कातडी, प्रक्रियायुक्त मांस, डेअरी उत्पादनांची निर्यात कमी झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Agriculture Department
Nashik Accident News : दुचाकी अपघातात एक ठार; दोन जखमी

आकडे बोलतात

(निर्यात कोटी रुपयांमध्ये)

कृषी व प्रक्रियायुक्त अन्न गेल्यावर्षी एप्रिल यंदाचा एप्रिल

फुलशेती आणि बिया १३४ १३५

फळे आणि भाजीपाला १४११ १६६०

प्रक्रियायुक्त फळे-भाजीपाला १०९७ १६३९

इतर प्रक्रियायुक्त अन्न २९१९ २७९०

एकुण १८,९७४ १८,४१०

Agriculture Department
Nashik Crime News : दरेगावला तरुणाची आत्महत्या; बांधकाम व्यावसायिकसह एकाविरुद्ध गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.