Nashik : जिल्हयात Lumpyने 58 जनावरे मृत; 50 पशुपालकांना अनुदान मंजूर

Lumpy-Skin-Disease
Lumpy-Skin-Diseaseesakal
Updated on

नाशिक : राज्यात १३ हजार ५०० जनावारांचा लम्पी मृत्यू झालेला असताना नाशिक जिल्ह्यातही आतापर्यंत ५८ जनावरं दगावली आहेत. यापैकी ५० पशुधन मालकांना नुकसान भरपाई मिळाली आहेत. जिल्ह्यात ९९.९९ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेने लम्पीबाबत नाशिकची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांच्या आढावा बैठकीत दिली.

जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ७७ गावांमधील १ हजार १८८ जनावरांना लम्पीची प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी ९१४ बाधित जनावरे बरी झालेली आहेत. सद्यपरिस्थितीत २१५ जनावरे आजारी असून यातील २० जनावरे अतिगंभीर आहेत. ४५ जनावरे गंभीर असून १३५ सौम्य आजाराने बाधित आहेत. आतापर्यंत यातील ५८ जनावरे दगावली आहेत. (58 animals dead in Lumpy district Grant sanctioned to 50 cattle breeders in district Nashik News)

Lumpy-Skin-Disease
Nashik : क्रीडा शुल्कात जिल्हाधिकाऱ्यांकडून 50 % माफी; शिक्षकांच्या संघर्षाला यश

यात बागलाण तालुक्यातील सर्वाधिक जनावरे आहेत. त्यापाठोपाठ सिन्नर व मालेगाव तालुक्यातील जनावरांचा समावेश आहे. सिन्नर, इगतपुरीत चांदवड, मालेगाव व बागलाण तालुक्यात आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहेत. जिल्ह्यात एकूण ८ लाख ९५ हजार ५० पशुधन असून त्यापैकी सुमारे ८ लाख ९४ हजार ९५९ जनावरांचे लसीकरण झाले आहेत. बाधित जनावराच्या ५ किलोमीटर परिसरात लसीकरण करण्याचे शासनाकडून आदेश होते.

परंतु या आजाराचा संभाव्य धोका बघून सरसकट लसीकरण करण्याचे आदेश प्राप्त झाले त्यानुसार जिल्ह्यात युद्ध पातळीवर जनावरांचे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या पशुपालकास १०० टक्के राज्य शासनाच्या निधीमधून आर्थिक मदत दिली जात आहे. ३० पशुपालकांनी ही आर्थिक मदत प्राप्त झाली असून अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केले आहे. २० प्रस्तांवाना मंजूर झाले असून लवकरच त्यांना अनुदान वर्ग केले जाईल, असे डॉ.विष्णू गर्जे यांनी सांगितले.

तालुकानिहाय मृत जनावरे

चांदवड (३), मालेगाव (११), सिन्नर (१५), इगतपुरी (५), बागलाण (१२), देवळा(०), येवला(२), निफाड (५), नाशिक(०), पेठ (१), दिंडोरी (१), नांदगाव(२) कळवण (१).

Lumpy-Skin-Disease
Nashik : दादा भुसे यांची शिवभोजन केंद्राला Surprise visit

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()