Nashik Fraud Crime : शेअर ट्रेडिंग प्रकरणी 6 दलालांना अटक

fraud case
fraud caseSakal
Updated on

Nashik Fraud Crime : शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करून त्यावर जादा परताव्याचे वा दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सुमारे ३५ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी आणखी सहा दलालांना (एजंट) अटक करण्यात आली आहे. (6 brokers arrested in share trading case nashik fraud crime news)

या प्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने दोघा संशयितांना यापूर्वीच अटक केली असून, सध्या ते मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत

संशयित अविनाश विनोद सूर्यवंशी (रा. लासलगाव), अमोल कैलास शेजवळ (रा. शिर्डी, जि. नगर) यांनी श्री आदिशक्ती फॉरचून सोल्यूशन एलएलपी ट्रेड जंक्शन व महाशक्तिमाया अर्बन निधी लि. या नावाने दोन ट्रेडिंग कंपनी स्थापन केल्या होत्या.

या माध्यमातून त्यांनी शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना ११ महिन्यांत दामदुप्पट व १८ टक्के दरमहा परताव्याचे आमिष दाखविले होते. या प्रकरणी संशयितांनी ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका व भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

fraud case
Nashik Bribe Crime : पाथरेचा लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ अटक

दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत सहा दलालांना (एजंट) गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. नंदकुमार निवृत्ती वाघचौरे (वय ३८), प्रशांत रामदास पाटणकर (३४), वैभव विजय ननावरे (२६), साईनाथ केशव त्रिपाठी (२४), भाऊसाहेब बाबूलाल पाटील (३५), ज्ञानेश्वर रामकृष्ण वाघ (४१, सर्व रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दलालांची नावे आहेत.

या संशयितांनी मुख्य संशयित सूर्यवंशी याचे बँक खात्यावर प्रत्येकी ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याने या सहा जणांना अटक करण्यात आली. या संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

आदिशक्ती फॉरचून सोल्यूशन एलएलपी ट्रेड जंक्शन, महाशक्तिमाया अर्बन निधी लि. या कंपन्यांमार्फत कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस आयुक्तालय, गंगापूर रोड याठिकाणी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. कुठल्याही जादा परताव्याच्या आमिषांना बळी न पडता आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन शहर पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

fraud case
Nashik Bribe Crime : शिवाजी चुंभळेंविरुद्ध पकड वॉरंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.