nagpur rto 20 post vacant right to information revealed this job govt job news
nagpur rto 20 post vacant right to information revealed this job govt job newssakal

Nashik News: आकर्षक क्रमांकातून ‘आरटीओ’ला 6 कोटी 78 लाखांचा महसूल

Published on

Nashik News: आकर्षक वाहन क्रमांक खरेदीकडे वाहनधारकांचा कल वाढत चालला असून, या नोंदणीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसुलात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत १ कोटी १४ लाख ८३ हजारांची वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत एकूण ६ कोटी ७८ लाख ९१ हजार रुपये महसुल जमा झाला आहे. या वर्षी ७८०८ वाहनधारकांनी पसंती दाखविली आहे. (6 crore 78 lakhs revenue to RTO from attractive numbers nashik news)

प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी, परवाना व नूतनीकरणासह व्यवसाय कर व पर्यावरण कर या माध्यमातून महसूल जमा होत असतो. तसेच आकर्षक नोंदणी क्रमांक विक्रीतूनही महसूल मिळत असतो. या क्रमांक खरेदीकडे वाहनधारकांचा कल वाढलेला आहे. मागील आर्थिक वर्ष एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ ला आकर्षक वाहन क्रमांक नोंदणीतून कार्यालयास ५ कोटी ६४ लाख आठ हजार रुपये महसूल जमा झाला.

आकर्षक वाहन क्रमांक याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत तब्बल ६ कोटी ७८ लाख ९१ हजार रुपये महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन क्रमांक नोंदणीतुन १ कोटी १४ लाख ८३ हजार रुपयांनी महसुलात वाढ झाली आहे. तसेच मागील वर्षी ६६८४ तर या वर्षी ७८०८ वाहन धारकांनी पसंती दाखविली आहे.

nagpur rto 20 post vacant right to information revealed this job govt job news
Nashik Winter Update: जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढला; धुक्यामुळे शेतीची चिंता वाढली

सर्वसाधारण क्रमांक घेण्यासाठी रुपये ३ , ४ व ५ हजार अशी रक्कम आकारली जाते. वाहनधारकांनी यामध्ये सर्वाधिक रस दाखविल्याचे दिसते. मागील वर्षी ४१४६, तर या वर्षी ४६३२ वाहनधारकांनी हे क्रमांक घेतले आहेत.

आकर्षक वाहन क्रमांक घेण्यात वाहनधारकांचा कल हा दिवसागणिक वाढत चालला आहे. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत दुचाकी २६०७, तर चारचाकी ३०४५ होती. या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत दुचाकी २६७२, तर चारचाकी ३५८२ वाहनधारकांनी पसंती दाखविली आहे.

चारचाकीच्या क्रमांक एकला चार लाख फी

दुचाकीच्या क्रमांक १ साठी पन्नास हजार रुपये फी असून मागील वर्षी ६४, तर या वर्षी ७३ वाहनधारकांनी क्रमांक १ घेतला आहे. तसेच चारचाकीचा वाहन क्रमांक १ घेण्यासाठी तब्बल चार लाख रुपये फी असल्याने मागील वर्षी एक तर या वर्षीदेखील एकानेच पसंती दाखविली आहे.

nagpur rto 20 post vacant right to information revealed this job govt job news
Cough Cure Remedies: सावधान! खोकल्‍यावर घरगुती उपचार...ठरू शकतो धोकादायक; व्‍हायरल ब्राँकायटिस’चा संसर्ग वाढला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.