Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alertesakal

राज्यात जूनमध्ये ६ दिवस हलक्या पावसाचा अंदाज

Published on

नाशिक : राज्यात ५ ते १० जून आणि १५ ते २२ जून अशा दोन टप्प्यात हलक्या स्वरुपाचा (Light rain) पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र अभ्यासकांनी वर्तवला आहे. या अभ्यासकांच्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ३० जूनपासून दोन दिवस मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.(6 days light rain forecast in the state in June Nashik News)

मॉन्सूनचे (Monsoon) केरळमध्ये आगमन झाल्यावर अरबी समुद्रातून (Arabian Sea) गुजरातमार्गे महाराष्ट्रात पाऊस दाखल झाल्याचा यापूर्वीचा अनुभव आहेच. मात्र यंदा मॉन्सूनचे सिंधुदुर्गमार्गे आगमन होण्याची शक्यता आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार राज्यभर २० जुलैपासून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड अशा राज्याच्या काही भागात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशातगीच्या कामांनी वेग घेतला आहे. प्रत्यक्षात चांगला पाऊस झाल्याखेरीज खरीपाची पेरणी करण्यात येऊ नये, असा सल्ला कृषी विभागातर्फे यापूर्वी देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert
नाशिकला CNG संपला; गॅस संपल्यामुळे तारांबळ

निसर्गचक्रातून संकेत

मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल निसर्गचक्रातून लागत असते. राज्याच्या काही भागात मात्र मॉन्सूनचे आगमन काहीसे विलंबाने होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कावळ्यांनी झाडाच्या फांद्याच्या टोकाला घरटे बांधण्यास सुरवात केल्याचे लक्षण त्याचे असल्याचे मानले जात आहे. एवढेच नव्हे, तर पर्यावरण अभ्यासकांनी राज्याच्या काही भागात पक्ष्यांची घरटे बांधण्याचे काम चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत झाल्याकडे लक्ष वेधले आहे.

Maharashtra Rain Alert
नाशिक : खरीप हंगामासाठी 17 हजार हेक्टरवर पेरणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()