Nashik News : भाजपच्या सत्ताकाळात बारा मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव गुंडाळण्यात आल्यानंतर आता सहा मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
मात्र बीओटीवर जागा विकसित करताना दोन ठिकाणचे भूसंपादन आवश्यक असल्याचेदेखील कारण देण्यात आल्याने यातून भूसंपादनाचा प्राधान्यक्रम डावलण्याचा एक भाग मानल्याचे मानले जात आहे.(6 Incomes BOT Development Proposal nashik news)
महापालिकेत भाजपची सत्ता असताना जवळपास ११ मिळकती बांधा वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी कमलेश कन्सल्टंट ॲन्ड देवरे- धामणे आर्किटेक या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सल्लागार संस्थेच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ही नियुक्तीदेखील वादात सापडली.
दोन वर्ष बीओटीचे भूत फायलीखाली दडपले असताना आता नव्याने सहा भूखंड विकसित करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यासंदर्भात बीओटी समितीची बैठक झाली. त्यात गंगापूर रोड, वडाळा भागातील भूखंड विकसित करताना आरक्षण संपादित करण्याची शिफारस करण्यात आली.
याचाच अर्थ मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करताना भूसंपादनाची अट त्यात टाकून दोन भूसंपादन प्रस्ताव प्राधान्यक्रम समितीला विचारात न घेताच मंजूर करण्याचा घाट घातल्याचा संशय व्यक्त होत आहे.
स्वतंत्र निविदेचा प्रस्ताव
गंगापूर रोडवरील मॅग्नम हॉस्पिटलजवळील १२ हजार चौरस मीटर जागेपैकी ५ हजार दोनशे चौरस मीटरचे दोन प्लॉट आहे. मात्र, या ठिकाणी १७०० चौरस मीटर जागेचे संपादन बाकी असल्याने १२ हजार चौरस मीटर जागेचे ‘बीओटी’करण करण्यासाठी स्वतंत्र निविदेचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे.
त्याचबरोबर उर्वरित १७०० चौरस मीटर जागेच्या संपादनाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशी शिफारसदेखील मांडण्यात आली आहे. या शिफारसींचा आधार घेऊन डीजीपीनगर येथील हॉस्पिटल अमिनिटीच्या आरक्षणासाठी रोड नसल्याने १८ मीटर डीपी रस्त्याचे भूसंपादन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
भालेकर शाळेचा विकास
नगरपालिका काळापासून भालेकर शाळा अस्तित्वात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा बंद असल्याने तसेच मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालय दुरुस्तीचे काम सुरू असल्याने भालेकर हायस्कूलमध्ये कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर स्मार्टसिटी कंपनीकडून पार्किंग करण्यासाठी बीओटीवर प्रस्ताव तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
देवळाली येथील महात्मा गांधी टाऊन हॉलचा वापर वाणिज्य कारणासाठी तसेच सातपूरच्या महापालिका कार्यालय व टाऊन हॉलची जागा विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आकाशवाणी टॉवर येथील मधुर स्वीट येथील जागा महापालिकेच्या ताब्यात असल्याने यापूर्वीच निविदा अंतिम करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याचीदेखील शिफारस आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.