Nashik News : कोळगावला पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 6 जखमी

Stray dog
Stray dogesakal
Updated on

देवगाव (जि. नाशिक) : कोळगाव (ता. निफाड) येथे पिसाळलेल्या भटक्या श्वानाने सहा व्यक्तींवर हल्ला करत चावा घेतला असून त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (6 injured in Kolgaon dog attack Nashik News)

कोळगाव येथे गुरुवारी (ता. १९) सकाळी सात ते आठच्या सुमारास आशा पंडित घोटेकर (वय ३५), बाबूराव लक्ष्मण घोटेकर (वय ७५), सानिया अश्पाक शेख (वय २२), केदार अंबादास कांबळे (वय २३), भीमाबाई शिवनाथ घोटेकर (वय ७०), जया राजेंद्र कोकाटे (वय २२) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

संबंधित श्वान पिसाळलेल्या अवस्थेत असल्याने या जखमींना अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

कोळगाव येथे भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून शाळा परिसरात दहा ते वीस कुत्र्यांचे टोळके बसलेले असते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Stray dog
Nashik Crime News: परप्रांतीय गुन्हेगारांसाठी सातपूर- अंबड ठरतंय आश्रयस्थान! पोलिसांकडून Moniteringची आवश्‍यकता

बालक बचावला

देवगावफाटा, देवगाव, रुई, कोळगाव परिसरात बाहेर गावावरून रात्री कुत्रे सोडले जातात. याठिकाणी कुत्र्यांचा जथ्था परिसरात दहशत माजवीत आहे.

देवगाव परिसरातील अंगणवाडीतील बालक कुत्र्याच्या टोळक्यातून थोडक्यात नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचावला. त्यामुळे बाहेरगावच्या कुत्र्यांचा गावात कुत्रे सोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Stray dog
Solapur Crime News: जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()