Nashik Crime News : रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनी व्यवस्थापकाचे बँक कार्ड परस्पर स्वाइप करून तब्बल ६ लाख रुपये हडप केल्याप्रकरणी नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांचे पुत्र सूरज पवार आणि पवार (पुर्ण नाव नाही) या दोघांवर मनमाड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (6 lakhs extended by swiping the card case registered against former MLA of Nandgaon Nashik Crime News)
रामअवतार सिंह श्रीहरीफुल सिंह (वय ४५, दूदाना काबास दुंबरा, ता. नवलगड, जिल्हा झुंझन, रा. राजस्थान, ह.मु.हिसवळ बुद्रूक, ता. नांदगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. श्री. सिंह हे जयपूरमधील आरएसबी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत नोकरीला आहेत.
कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनमाड- नांदगाव राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिट रोड बनविण्याचे काम घेतले आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२२ या दरम्यान काम सुरू असताना कंपनीच्या गाड्यांना लागणारे पेट्रोल, डिझेल हे माजी आमदार संजय पवार यांच्या पेट्रोलपंप येथून भरले जात होते. इंधनाच्या बिलापोटी क्रेडीटकार्डद्वारे बिल अदा केले जाते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पेट्रोल पंप बिलापोटी तीस हजार देणे बाकी होते. त्यावर कंपनीचे मनोज कुमार पारीख यांनी डिझेल इन्चार्ज राकेश कुमार यांना संबंधित तीस हजारांचे बिल अदा करावयास सांगितले.
राकेश कुमार हे बिल भरण्याकामी पेट्रोल पंप येथे गेले असता त्याठिकाणी संजय पवार यांचे पुत्र सूरज पवार होते. त्यांनी इंटरनेट कनेक्शन बंद असून कनेक्शन सुरळीत झाल्यानंतर बिल अदा करून घेत कार्ड सकाळी परत पाठवून देतो असे सांगितले.
श्री. पवार यांनी कार्डहून स्वतःचा फायदा करून घेत बिलापेक्षा जवळपास सहा लाख रुपयाचे जास्तीचे स्वॅप मारले. याबाबत सदर घटना ही कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. चौकशीअंती माजी आमदार संजय पवार यांचे पुत्र सूरज पवार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.