Nashik News : शहरातील कत्तलखाने व कोंडवाड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेत आता सहा पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
या निर्णयामुळे बेकायदा होणारी जनावरांचे कर्तव्य तसेच व जनावरांमुळे होणारे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. (6 livestock supervisors will appointed in city Nashik News)
महापालिकेमध्ये पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून श्वान निर्बीजीकरण तसेच कत्तलखाने व कोंडवाड्यांचे व्यवस्थापन केले जाते. परंतु महापालिकेमध्ये फक्त पशुवैद्यकीय अधिकारी एवढे एकमेव पद मंजूर असल्याने त्यांच्या मार्फतच सर्व प्रक्रियांचे संचलन होते.
परंतु शहराचा विस्तार वाढत असताना श्वान निर्बीजीकरण, कत्तलखाने व कोंडवाड्यांचे व्यवस्थापन प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महासभेने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली असून, सहा विभागाकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे पशू अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पशुधन विकास अधिकाऱ्याला मासिक ४० हजार रुपये तर पशुसंवर्धन पर्यवेक्षकाला २५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पशुधनाची होणार गणना
श्वान निर्बीजीकरण व कोंडवाड्यातील जनावरांचे व्यवस्थापन करण्याबरोबरच पशुधनाची सांख्यिकी माहिती संकलित करण्याचे काम पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुधन विकास अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.
कत्तलखान्यात साफसफाई करणे, कत्तलीसाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांची नोंद ठेवणे, जनावरे कत्तल फी वसूल करणे, मांस विक्री परवाने देणे, मोकाट शहरांच्या तक्रारींची निराकरण करणे, मोकाट जनावरांसंदर्भात आलेल्या तक्रारींची निराकरण करणे
, गोठ्यांची सांख्यिकी माहिती ठेवणे, डुकरे पकडण्याच्या मोहिमेवर नियंत्रण ठेवणे, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना आदी कामे करावे लागणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.