Satpur Shootout Case : सातपूरमधील गोळीबारप्रकरणी 6 जणांवर अखेर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांचे आदेश

Crime
Crimeesakal
Updated on

Satpur Shootout Case : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरामध्ये पूर्ववैमनस्यातून सिनेस्टाइल पाठलाग करीत संशयितांनी कारने धडक देत भरदिवसा गोळीबार केला.

याप्रकरणी सहा संशयितांविरोधात मोक्काअन्वये (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कलमान्वये) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (6 people finally Moca in Satpur Shootout Case Orders of Commissioner of Police nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Crime
Sangali Crime News : तरुणाची भर रस्त्यात हत्या, कूपवाडमध्ये मुळशी पॅटर्नचा थरार

आशिष राजेंद्र जाधव (वय २८, रा. अमर रो-हाउस, शिवाजीनगर, सातपूर), भूषण किसन पवार (२६, रा. माऊली निवास, शिवाजीनगर, सातपूर), रोहित मंगलदास अहिरराव (२७, रा. परफेक्ट हाईट्स‌, शिवाजीनगर, सातपूर), गणेश राजेंद्र जाधव (२६, रा. अमर रो-हाउस, शिवाजीनगर, सातपूर), किरण दत्तात्रय चव्हाण (२४, रा. उद्धव सोसायटी, शिवाजीनगर, सातपूर), सोमनाथ झांजर ऊर्फ सनी (२२, रा. सातपूर) अशी मोक्का लावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मुख्य संशयितांसह काही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत.

गेल्या १९ मार्चला पूर्ववैमनस्यातून कारचालक तपन जाधव याच्यावर गोळी झाडली होती. याप्रकरणी राहुल पवारने फिर्याद दिली होती. सातपूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक महेंद्र चव्हाण व सध्याचे निरीक्षक पंकज भालेराव यांनी याप्रकरणी तपास केला. पुराव्याअंती संघटित गुन्हेगारी समोर आली आहे.

त्यानुसार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये या संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. मोक्कान्वये गुन्ह्याचा तपास अंबड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Crime
Crime News : भररस्त्यात विवाहितेच्या विनयभंगाचा प्रयत्न; 'कारमध्ये बस' म्हणत शिवीगाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.