सिडको : सिडको परिसरातील अंबड लिंक रोड येथे ६५ वर्षीय बच्चू कर्डेल या वृद्धाच्या खुनाच्या घटनेनंतर अंबड पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली आहेत. याबाबत मुलगा जगन्नाथ बच्चू कर्डेल यांनी फिर्याद दिली आहे.
हळद समारंभासाठी सर्व बाहेर गेलेले असताना बच्चू कर्डेल यांना बर वाटत नसल्याने ते घरीच होते. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्याशी बोलणेदेखील झाले होत. जगन्नाथ कर्डेल रात्री ९.४० मिनिटांच्या दरम्यान त्यांचा पुतण्या दिलीप कर्डेल यासोबत घरी आले. दिलीपने त्यांना घराबाहेर सोडून त्यांचा पुतण्या निघून गेला. (6 Special Teams of Ambad Police to investigate Bachu Kordel Murder Nashik Crime News)
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
त्या वेळी घराचा दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा असल्याने त्यांनी बच्चू कर्डेल यांना घराच्या बाहेरून आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर बच्चू कर्डेल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अंबड पोलिसांनी सहा पथके तयार केले असून संशयितांचा शोध सुरू आहे. खुनाच्या घटनेनंतर पोलिस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करत जातीने लक्ष देत पथके तयार केली.
शनिवारी (ता. २६) सराईत गुन्हेगारांसह एकूण ५० पेक्षा जास्त संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. अंबड पोलिसांच्या सहा विशेष पथकांशिवाय शहरातील सर्व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारीदेखील कामकाज बघत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.