Crop Insurance Scheme : कृषी विभागाकडून यंदा एक रूपयांत पीक विमा काढून मिळत आहे. पावळ्यातील जुलै महिन्याचे तीन आठवडे उलटूनही निफाड तालुक्यात समाधानकारक पाऊस नाही.
अशा स्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन भविष्यातील चिंता दूर केली आहे. (6 thousand farmers have taken out crop insurance in Niphad taluka nashik news)
निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. त्यात गोदाकाठ परिसरात पुराच्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिके वाहून जातात. अशा स्थिती पीकविम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळते. गेल्या वर्षापर्यत पिकविम्यासाठी दोन टक्के एवढी मोठी रक्कम मोजल्यानंतरही शेतकर्यांच्या पदरी निराशा पडायची.
त्यामुळे केद्राकडुन पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत आता एका रूपयांमध्ये पीकविमा मिळत आहे. उर्वरित विमा हप्त्याची रक्कम राज्य आणि केंद्र शासन विमाकंपनीकडे भरणार आहे. निफाड तालुक्यात ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून पीकविमा काढला जात आहे. आता पर्यत निफाड तालुक्यात पाच हजार 947 शेतकर्यांनी विम्याची रक्कम भरली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यंदा पर्जन्यमान समाधानकारक नसले तरी भविष्यात वरूणराजा बरसेल या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक पेरणी केली आहे. तब्बल 25 हजार हेक्टरवर म्हणजे 125 टक्के पेरणी निफाड तालुक्यात सोयाबीनची झाली आहे.
"पिकांना संरक्षण देऊन संभाव्य आर्थिक नुकसानीचा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एका रूपयात पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. सुमारे सहा शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. तालुक्यात विविध ठिकाणी कृषी सेवकांच्या माध्यमातून पिकविमा काढण्यासाठी शिबिरे घेतले जात आहेत, त्याचा फायदा करून घ्यावा." - सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.