नाशिक : अवघ्या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. १८) शहरासह जिल्हाभरात पावसाने (Rain) हजेरी लावली. विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नाशिक विभागांतर्गत सुमारे ६० बसफेऱ्या रद्द करावल्या लागल्या.
या बसफेऱ्या रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाचे संभाव्य एक लाख दहा हजार रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरले आहे. (60 bus trips of Nashik sections were cancelled due to heavy rain nashik rain Latest Marathi News)
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. छोट्या-मोठ्या नद्या ओसंडून वाहत असून, लहान पूल पाण्याखाली गेल्याने गावागावांतील संपर्क तुटला आहे. यामुळे एसटी बस वाहतूकही प्रभावित झाली आहे.
रविवारी (ता. १७) पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी पुन्हा जिल्हाभर पाऊस पडला. यामुळे सायंकाळी सहापर्यंत एसटी महामंडळाच्या नियोजित ५९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पंचवटी आगारातील सर्वाधिक ३३ बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यापाठोपाठ पेठ आगारातील १४ बसफेऱ्या रद्द झाल्या. या फेऱ्या रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे संभाव्य एक लाखाचे उत्पन्नावर पाणी फेरले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.