Diwali Ration Scheme : 60 हजार कुटुंबांची दिवाळी होणार गोड

Diwali faral in ration scheme
Diwali faral in ration schemeesakal
Updated on

अंतापूर (जि. नाशिक) : महाराष्ट्र शासन सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र शिधापत्रिका धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने त्यांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार शिधा जिन्नस असलेला संच देण्याचा निर्णय घेतला आहे.

एका संचासाठी शंभर रुपये लागणार आहेत. सदरच्या शिधावस्तू या दिवाळी सणापूर्वी स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित करणार येणार असल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटील यांनी दिली. (60 thousand families will get Diwali Ration Scheme profit at baglan nashik Latest Marathi)

Diwali faral in ration scheme
Sakal Anand Mahotsav : ‘नाटक कट्टा’च्या कलाकारांनी फुलविले चौफेर हास्य

बागलाण तालुक्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंतोदय योजनेच्या १३ हजार ३६८ शिरधापत्रिका असून, त्यावरील लाभार्थी संख्या ६५ हजार १७२ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या ४७ हजार ४८९ शिधापत्रिका व त्यावरील व्यक्ती संख्याही दोन लाख २४ हजार १४२ आहेत. सदर पात्र लाभार्थ्यांना तालुक्यातील १८७ स्वस्त धान्य दुकान वितरणाकडून दिवाळीपूर्वी ६० हजार ८५७ कुटुंबांची दिवाळी गोड करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्य गोदामात प्राप्त होणार असून, उर्वरित दुकानांमध्ये वेळेत धान्य पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरचे स्वस्त धान्य दुकानदारांना दिवाळी सणापूर्वी मिळणार असून, धान्य प्राप्त होतास अन्नधान्य वितरणाच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार अंतोदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकांनी आपले अन्नधान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपये देऊन ऑनलाईन पद्धतीने मुदतीत उचल करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार इंगळे- पाटील, पुरवठा अधिकारी एस. जी. भामरे, पुरवठा निरीक्षक विजय खरे यांनी केले आहे.

Diwali faral in ration scheme
Special Parcel Train : शेतकऱ्यांसाठी विशेष पार्सल ट्रेन सुरू; या दिवशी धावणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.