Nashik : गंगापूर धरणातून रोज 600 क्यूसेक पाणी गोदावरी पात्रात

gangapur dam
gangapur damesakal
Updated on

नाशिक : चार दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार सुरू असून, गंगापूर धरणातून रोज ६०० क्यूसेक पाणी गोदावरी पात्रात सोडले जात असल्याने प्रवाह वाहता झाला आहे, तर जायकवाडी धरणाच्या क्षमतेपेक्षा १५ टीएमसी पाणी अधिक सोडण्यात आल्याने औरंगाबादसह मराठवाड्याचा दोन वर्षांचा पाणीप्रश्न मिटला आहे. (600 cusec of water daily dissolution from Gangapur dam on Godavari tank Nashik Latest Marathi News)

gangapur dam
Anand Mahotsav 2022 | शास्त्रीय संगीत टिकविण्यासाठी प्रयत्नांची गरज : सचिन चंद्रात्रे

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सप्टेंबरमध्ये पूर्णपणे भरले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खालच्या भागासाठी पाणी सोडण्यात आले. सद्यःस्थितीत ९९.३७ टक्के इतके धरण भरले आहे. गेल्या वर्षी २० ऑक्टोबरला ९५ टक्के धरण भरले होते. या वर्षी अधिक धरण भरले आहे. चार दिवसांपासून धरण परिसरात मुसळधार सुरू असल्याने जलसंपदा विभागाने ६०० क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे गोदावरीसह उपनद्या प्रवाहित झाल्या आहेत. दरम्यान, नांदूरमध्यमेश्वर धरणात एक लाख १९ हजार ७३८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वरचे पाणी मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात पोचते. या धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी पोचल्याने पुढील दोन वर्षे येथील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

gangapur dam
Nashik Crime News : चोऱ्या- घरफोड्या जोमात; शहर पोलीस कोमात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.