Nashik Crime: भद्रकालीतून सव्वातीन लाखांची 600 किलो भांग जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

 Crime News
Crime News esakal
Updated on

नाशिक : शालीमारच्या शिवाजी रोडवरील वावरे लेनमधील म्हसोबा मंदीराशेजारी, पत्राच्या शेडमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याची खबर मिळताच अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून सुमारे सव्वातीन लाखांची 604 किलो भांग जप्त केली आहे. (600 kg of hemp worth three half lakh seized from Bhadrakali major operation by anti-narcotics squad nashik crime news)

याप्रकरणी पथकाने दोघांना अटक केली आहे पोलीस आयुक्तांनी निर्माण केलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला नाशिक शहर आयुक्तालय हददीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणा-या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

भद्रकाली पोलीस ठाणे हददीत वावरे लेग, शिवाजी रोड, शालीमार, नाशिक येथे दोन इसम हे भांग हा मादक पदार्थ विक्री करत असल्याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार बाळासाहेब राम नांदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

 Crime News
Jindal Fire Accident : जिदांलमधील मृत्यूमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 6 लाखांची मदत

सदर गोपनीय माहीतीबाबत खात्री करून अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे व विशेष पथकाने वावरे लेनमधील म्हसोबा मंदीराशेजारी, पत्राच्या शेडमध्ये शिवाजी रोड, शालीमार, नाशिक येथे छापा मारुन संशयित पवन युकदेव वाडेकर (वय २५ रा. म्हाडा कॉलनी, आडगाव शिवार, नाशिक), ज्ञानेश्वर बाळु शेलार (वय २८ रा. वावरे लेन, शिवाजी रोड, शालीमार, नाशिक) यांना ताब्यात घेतले.

त्यांचेकडून विक्रीसाठी असलेला ६०४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा एकुण ३,३०, १५३ रुपये किंमतीची भांग जप्त करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशय त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक निरीक्षक बांगर, एच. के. नागरे, पी.बी.सुर्यवंशी, हवालदार भामरे, गायकर, डाले, ताजणे, मणे, भालेराव, बाळे, कोल्हे, बाळासाहेब नहे, दिये, सानप, येवले, कुटे, वडजे, बागडे, फुलपणारे व श्रीमती मड यांनी कामगिरी केली आहे.

 Crime News
Nashik News : सिंचन पुनर्स्थापना खर्चमाफीसाठी शासनाकडे प्रस्ताव; पाणी कराराची प्रत NMCला प्राप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.