नाशिक : ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील रंगकर्मीमध्ये आनंदाला उधान आलेले बघावयास मिळत आहे. नाशिक केंद्रावरही १७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात झाली. यंदा नाशिककरांना तब्बल २८ नाटकांची मेजवानी अनुभवण्यास मिळाली. रसिक प्रेक्षकांनी या सर्व कलाकृतींचा मनमुराद आनंद घेतला. आता उत्सुकता आहे, ती निकालाची..! (61st haushi marathi Rajya Natya Spardha first choice of Khidkya by interested audience in Sakal Samvad nashik)
नियमित येणाऱ्या व एकही नाटक न चुकवणाऱ्या प्रेक्षकांशी 'सकाळ’ने निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधून, त्यांच्या नजरेतून संभाव्य निकाल अन् एकूण स्पर्धेविषयी प्रेक्षकांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
श्रीराम वाघमारे, महेश डोकफोडे, पूनम पाटील, भगवान निकम, आदित्य देशमुख, संकेत शिंदे या नियमित प्रेक्षकांनी या चर्चेमध्ये सहभाग नोंदविला. ‘सकाळ’चे उपवृत्तसंपादक प्रशांत कोतकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी ‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
स्पर्धेचा आनंद वेगळा
खरंतर, रसिकप्रेक्षक हा कलेचा मायबाप अन् एक अविभाज्य घटक असतो. स्पर्धेची गणितं विचारात न घेता तो त्याच्या नजरेतून स्पर्धेकडे आणि स्पर्धेतील सादरीकरणाकडे पाहत असतो. त्यामुळे रसिक प्रेक्षकांकडून मिळणारी मनमुराद दाददेखील रंगकर्मींसाठी एकप्रकारे स्पर्धा जिंकण्यासारखेच आहे. स्पर्धेमुळे जशी नवोदित कलाकारांना संधी मिळते, त्याचप्रकारे नव्याने नाट्यरसिक निर्माण होण्यासदेखील हातभार लागतो.
यंदाची राज्य नाट्य स्पर्धा ही मोठ्या उत्साह अन् जल्लोषात पार पडली. २८ नाटकांचे सादरीकरण यंदा झाले. मात्र हे सादरीकरण काहीच नाटकांचे दर्जेदार झाले, इतर नाटकांच्या संघांनी स्पर्धेत उतरातांना तयारीने यावे, दिग्दर्शकांनी खंबीर होत दिग्दर्शन अन् तांत्रिक बाजूंवरही काम करावे, अशी भावना या वेळी या रसिकप्रेक्षकांनी व्यक्त केली. यांसह राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीला संगीत आणि वेशभूषेला पारितोषिक दिले जाते, त्याप्रकारे प्राथमिक फेरीलाही देण्यात यावे, अशी मागणी प्रेक्षकांनी केली.
रसिक प्रेक्षक सांगतात, की आम्ही सर्वांनी मध्यांतरात नाटकातील कलाकारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणे, प्रयोगानंतर एकत्र जमून नाटकाच्या विविध अंगांवर चर्चा करणे. प्रत्येकाला नाटकातील कुठल्या बाबी आवडल्या, त्या नाट्यकृतीतील वेगळेपण, नाटकाचे सादरीकरण, ते बघताना त्यातून आलेला अनुभव या सर्वांवर आम्ही रोज चर्चा करायचो. आता सर्वांनाच निकालाचे वेध लागले आहेत.
निकालाबाबत प्रेक्षक म्हणून आम्हालादेखील तितकीच उत्सुकता आहे. प्रेक्षक म्हणून स्पर्धेतील सगळीच नाटकं आम्ही पाहिली असल्याने आमच्या नजरेतून हे नाट्यमत देण्याचा केलेला हा प्रयत्न. प्रेक्षक म्हणून आम्ही दिलेला हा कौल प्रत्यक्ष निकालापेक्षा कदाचित वेगळाही असू शकेल. मात्र नाट्यरसिक म्हणून कलावंतांचे प्रयत्न अन् सादरीकरण याविषयीचे हे मत असल्याचे उपस्थित प्रेक्षकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
नाटक :
१) खिडक्या (नाट्य भारती, इंदूर)
२) उदकशांत (कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, सिडको, नाशिक)
३) राशोमोन (अद्वित बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नाशिक)
दिग्दर्शन :
१) मनोज खैरनार (राशोमोन)
२) सचिन रहाणे (उदकशांत)
३) आनंद जाधव (इशक का परछा)
* अभिनय रौप्यपदक (पुरुष) :
श्रीराम जोग (खिडक्या)
अभिनय रौप्यपदक (स्त्री) :
शब्दजा वेलदोडे- देशपांडे (उदकशांत)
नेपथ्य :
१) दीपक चव्हाण (उदकशांत)
२) अनिरुद्ध किरकीरे (खिडक्या)
३) करण टिळे (गांधी आणि आंबेडकर)
प्रकाश योजना :
१) विनोद राठोड (उदकशांत)
२) चेतन ढवळे (राशोमोन)
३) कृतार्थ कन्सारा (इशक का परछा)
रंगभूषा :
माणिक कानडे - १) राशोमोन २) चेटुकवार ३) शक्ती शिवाचा तेजोगोल
उत्कृष्ट अभिनय प्रमाणपत्र (पुरुष) :
सचिन रहाणे (उदकशांत), सूरज मौर्य (राशोमोन), दिलीप काळे (चांदणी), रोहीत पगारे ( गांधी आणि आंबेडकर), स्परूप बागूल (बॅलन्सशीट), किरण जायभावे (इशक का परछा)
उत्कृष्ट अभिनय प्रमाणपत्र (स्त्री) :
प्रज्ञा पाटील (राशोमोन), प्रांजल सोनवणे (पळा पळा कोण पुढे पळे तो), सई मोने (शीतयुद्ध सदानंद), अनुजा देवरे (चांदणी), श्रिया जोशी (बॅलन्सशीट), मोनिका वाघमारे (इशका का परछा)
यांसह राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीला संगीत आणि वेशभूषेला पारितोषिक दिले जाते, त्याप्रकारे प्राथमिक फेरीलाही देण्यात यावे, अशी मागणी प्रेक्षकांनी या वेळी केली. त्यानुसार प्रेक्षकांनी दिलेला हा निकाल.
संगीत :
१) प्रणिल तिवडे (उदकशांत)
२) भूषण भावसार, जय खोरे, धीरज शांडिल्य (राशोमोन)
३) रोहित सरोदे, संजय अडावदकर (शीतयुद्ध सदानंद)
वेशभूषा :
१) भक्ती ढिकले (राशोमोन)
२) संगीता भोईर, संजय जरिवाला (शक्ती शिवाचा तेजोगोल)
३) प्रबुद्ध मागाडे (उदकशांत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.