Rajya Natya Spardha : ‘मोनोटोनी’तला सुवर्णमध्य ‘सौभाग्यवती चिरंजीव’!

An episode from the play 'Saubhagyavati Chiranjeev' performed at the State Drama Competition on Thursday.
An episode from the play 'Saubhagyavati Chiranjeev' performed at the State Drama Competition on Thursday.esakal
Updated on

नाशिक : नवरा- बायकोचे भांडण, नात्यात पडू पाहणारी फूट अन् त्यातून साधलेला सुवर्णमध्य, हे सारं एका सूत्रात गुंफून सूत्रधाराच्या मदतीने कथानकाचे सुटसुटीत सादरीकरण म्हणजे ‘सौभाग्यवती चिरंजीव’ हे नाटक. सहज सोप्या संवादातही शाब्दिक कोटी आणि सहज अभिनयामुळे नाटक प्रभावी ठरतं.

त्याचवेळी अचूक टायमिंग, सूत्रधाराच्या माध्यमातून बरीचशी गुंतागुंत कमी करून सादरीकरणाचा सांभाळलेला बाज यासारख्या जमेच्या बाजूंमुळे हे नाटक निश्‍चितच स्पर्धेत आपलं स्थान पक्कं करेल, असा विश्‍वास वाटतो. (61st haushi Rajya Natya Spardha Saubhagyavati Chiranjeevi in Monotony nashik news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

An episode from the play 'Saubhagyavati Chiranjeev' performed at the State Drama Competition on Thursday.
Bafna Crime Case : अखेर विपीनच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा!

६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गुरुवारी (ता. १५) बाबाज्‌ थिएटरने अक्षय संत लिखित व आरती हिरे दिग्दर्शित ‘सौभाग्यवती चिरंजीव’ हे दोन अंकी नाटक सादर केले. वयाच्या साधारण चाळीशीत प्रत्येकाच्याच आयुष्यात येणाऱ्या ‘मोनोटोनी’ ला केंद्रस्थानी ठेऊन गुंफलेलं हे अतिशय सुटसुटीत कथानक आहे.

मोनोटोनीचा परिणाम म्हणून पती- पत्नीमध्ये क्षुल्लक कारणांवरून सतत उडणारे खटके, कधी लटका राग, तर कधी टोकाची भूमिका घेण्यापर्यंतचा वाद यासारखे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात अनुभवावयास मिळतात. तरीही शिर्षकापासूनच उत्सुकता निर्माण करणारे हे कथानक सूत्रधाराच्या माध्यमातून अधिक सुटसुटीतपणे सादर करण्यात दिग्दर्शकांपासून कलावंतांपर्यंत सर्वांनाच सोयीचे ठरते. त्यामुळेच अभय सूर्यवंशी, श्रीकांत वाखारकर व श्रुती चांदोरकर या तीनही कलावंतांना आपापल्या भूमिकेला उचित न्याय देता आला.

त्यात अतुल दुर्वे व लक्ष्मी पिंपळे यांनी साजेसे नेपथ्य साकारून सादरीकरणाचा बऱ्यापैकी भार लिलया पेलला आहे. प्रणिल तिवडे यांनीही संगीत संयोजनाची बाजू अत्यंत चोखंदळपणे सांभाळली. रवी रहाणे यांची प्रकाश योजना माणिक कानडे यांची रंगभूषा आणि कविता आहेर यांची वेशभूषा यासारख्या अन्य तांत्रिक बाजूदेखील सादरीकरणाला पूरक अशाच होत्या.

An episode from the play 'Saubhagyavati Chiranjeev' performed at the State Drama Competition on Thursday.
Nashik News : गणेशनगर येथील खडीक्रेशर सील; विनापरवाना उत्खननावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.