PM Crop Insurance Scheme : 62 अर्ज टपाल विभागात दाखल

PM crop insurance scheme latest marathi news
PM crop insurance scheme latest marathi newsesakal
Updated on

जुने नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेचे टपाल विभागात अर्ज करण्यासाठी ३१ जुलै मुदत दिली होती. ३१ पर्यंत जिल्हाभरातील टपाल विभागात ६२ पीकविमा अर्ज दाखल झाले, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली. (62 applications for crop insurance filled in postal department nashik Latest Marathi News)

PM crop insurance scheme latest marathi news
Nashik : यंदा ‘MVP’ सभासद देणार 21 मते

शेती पिकांचे विविध कारणांनी नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयात अर्ज भरून द्यावयाचे होते.

त्यासाठी ३१ जुलै मुदत दिली होती. त्यात एक दिवसाची वाढ करून १ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयांत ६२ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज दाखल केले. ३१ जुलैअखेर टपाल विभागाच्या नाशिक विभागातून सुमारे ४१, तर मालेगाव विभागातून सुमारे २१, अशा ६२ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

टपाल विभागात दाखल झालेले विमा अर्ज ऑनलाइन पंतप्रधान कृषी विभागास सादर होणार आहेत. त्यांच्यामार्फत पिकांचे नुकसान झाल्यास नियमानुसार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम प्राप्त होणार आहे. त्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल.

PM crop insurance scheme latest marathi news
बांधकाम विभागातून हिशेबाची कागदपत्रे गायब; गैरव्यवहार लपविल्याचा संशय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.