Nashik Unseasonal Rain Damage : दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे ३४ हजार ९५२ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला.
बाधित ६५ हजार ८४९ शेतकऱ्यांना मदतीसाठी ६२ कोटी ५४ लाख ९० हजारांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. (63 crore required for victims of unseasonal rain crop damage nashik news)
सोसाट्याचा वारा आणि गारांच्या पावसाने द्राक्ष, कांदा, टोमॅटो यांसह ऊस व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्षबागांमध्ये अक्षरश: गारांचा ढीग साचला होता. त्यामुळे निफाड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या पाहणी अहवालात करण्यात आली. कृषी विभाग व महसूलच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अंतिम मंजुरी दिली.
अहवालानुसार जिल्ह्यातील एक हजार ३१६ गावांतील ६५ हजार ८४९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कोरडवाहू व बागायत अशा दोन्ही मिळून ३४ हजार ९५२ हेक्टरला अवकाळीचा तडाखा बसला. या शेतकऱ्यांना मदतीसाठी ६२ कोटी ५४ लाख ९० हजारांचा आराखडा राज्य शासनाला सादर झाला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी १८ हजार रुपयांप्रमाणे सरासरी मदत मिळू शकते. राज्य शासन यावर काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अंतिम अहवालाला मंजुरी
जिल्हा प्रशासनाने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा ३३ टक्क्यांवरील नुकसानीचा अंतिम अहवाल मंजूर केला आहे. त्यात कोरडवाहू पिकाखालील पाच हजार ७९० हेक्टरचे नुकसान झाले. यात ४८८ गावांतील ११ हजार ३०० शेतकरी बाधित झाले असून, त्यांच्यासाठी चार कोटी ९२ लाखांची आवश्यकता आहे.
तर बागायत पिकाखालील १४ हजार ५२३ हेक्टरचे नुकसान झाले असून, ३८२ गावांतील २९ हजार ८३६ शेतकरी बाधित झाले आहेत. बहुवार्षिक फळपिकांखालील १४ हजार ६३८ हेक्टरला अवकाळीचा तडाखा बसला. ४४६ गावांतील २४ हजार ७१३ शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी ३२ कोटी ९३ लाख रुपयांची आवश्यकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.