ZP Bharti Exam : जि. प. भरतीत विविध पदांसाठी 669 परीक्षार्थींनी दिली परीक्षा

 exam
examesakal
Updated on

ZP Bharti Exam : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतर्फे मंगळवारी (ता. १७) तारतंत्री, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक पदासाठीची परीक्षा ही एकूण तीन परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. (669 candidates appeared for various posts in zp recruitment exam nashik news)

तारतंत्री या पदासाठी ३७ पैकी ३१ परीक्षार्थी उपस्थित होते. जोडारी या पदासाठी सहापैकी पाच परीक्षार्थी उपस्थित होते; तर पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी ७४७ पैकी ६३३ परीक्षार्थी उपस्थित होते. एकूण १२१ परीक्षार्थी गैरहजर होते.

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील विविध पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी (ता. १५) कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) व कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी परीक्षा झाली.

 exam
Nashik ZP News: अखर्चित निधी वेळेत जमा केल्याचा जि. पला फटका; जमा न करणाऱ्या जिल्हा परिषदांना मिळाली मुदतवाढ

यात कनिष्ठ लेखाधिकारी पदासाठी १०१ परीक्षार्थींपैकी ७६, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठी १७५ परीक्षार्थींपैकी १३२, तर कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी ६५ परीक्षार्थींपैकी ५६ जणांनी परिक्षा दिली. तिन्ही पदांसाठी एकूण ७७ परीक्षार्थींनी दांडी मारली होती.

मंगळवारी तारतंत्री, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक या पदांसाठी शांततेत परीक्षा झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर उपस्थित अधिकाऱ्यांकडून परीक्षा सुरळीत सुरू असल्याबाबतची माहिती घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनीही सर्व परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

 exam
Nashik News : हतबल पोलिसही अन् पालकमंत्रीही! फक्त पुन्हा-पुन्हा अल्टिमेटम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.