NMC on Unauthorized Hoardings: 68 होर्डिंग्जधारकांना अंतिम नोटिसा; स्टॅबिलिटी सर्टिफिकेट न दिल्यास कारवाई

NMC on Unauthorized Hoardings
NMC on Unauthorized Hoardingsesakal
Updated on

NMC on Unauthorized Hoardings : महापालिकेच्या विविध कर विभागाकडे आतापर्यंत ७७७ होर्डिंग्जधारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केले असून, ६८ होर्डिंगधारकांना अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शनिवारी (ता. २४ ) प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपुष्टात येणार आहे. (68 Final Notices to Holders of Hoardings Action for non grant of stability certificate by nmc nashik)

पिंपरी- चिंचवड शहरात मुंबई- बेंगळुरू महामार्गावर रस्त्यालगतचे अनधिकृत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली होती. त्यात पाच जणांचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले होते. घटनेनंतर राज्य शासनाने महापालिकांना होर्डिंग्जचे स्थिरता प्रमाणपत्र तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या विविध कर विभागाने ८४५ होर्डिंग्ज धारकांना नोटिसा पाठवून २५ जूनच्या आत स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या स्थिरता प्रमाणपत्रासाठी संदीप फाउंडेशन व मराठा विद्या प्रसारक संस्थेची नियुक्ती केली.

आतापर्यंत ७७७ होर्डिंगधारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केले आहेत. ६८ होर्डिंगधारकांकडून दाद मिळतं नसल्याने त्यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. २५ जूनच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यास होर्डिंग्ज जप्त केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC on Unauthorized Hoardings
NMC PWD News: मिरची चौकातील डागडुजी निकृष्ट; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट

विभागनिहाय होर्डिंग्जच संख्या

विभाग एकूण होर्डिंग

पश्चिम ३१३
पूर्व १९२
पंचवटी ९७
नाशिक रोड ९९
सिडको ७४
सातपूर ७०
--------------------------------
एकूण ८४५

"शहरातील आतापर्यंत ८४५ पैकी ७७७ होर्डिंगधारकांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. उर्वरित ६८ जणांना प्रमाणपत्रासाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नाही तर जप्त केले जाईल." - श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर विभाग, महापालिका

NMC on Unauthorized Hoardings
NMC Tax Recovery: मोठ्या थकबाकीदाराची संकेतस्थळावर यादी जाहीर; 11 जणांकडे एक कोटींहून अधिक रक्कम थकीत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.