Nashik Crime: जागरूक कार्यकर्त्यांमुळे 7 जनावरे वाचली; मोकाट जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन पळविणारी टोळी

stray cows
stray cowsesakal
Updated on

Nashik Crime : शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. या मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने महापालिकेकडून वेळोवेळी कारवाईही केली जाते.

परंतु तरीही मोकाट जनावरांची समस्या सुटलेली नाही. नेमकी हीच बाब हेरून शहरातील मोकाट जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांना कत्तलीसाठी नेणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर येते आहे.

सोमवारी (ता.२) मध्यरात्री पाथर्डी फाटा येथे गो-तस्करांकडून सात गोवंशांना भुलीचे इंजेक्शन देत, ते कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न असतानाच जागरूक कार्यकर्त्यांच्या ते लक्षात आले. त्यामुळे गो- तस्करांना पलायन करावे लागल्याची घटना घडली आहे.

याबाबत इंदिरानगर पोलिसात तक्रार अर्ज देण्यात आला असून, शहरभरात अशा तस्करांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता असल्याने त्या जेरबंद करण्याची मागणी होत आहे. (7 animals saved due to vigilant activists gang that drives free animals by injecting them with Bhuli Nashik Crime)

सोमवारी मध्यरात्री पाथर्डी फाटा येथील महादेव पेट्रोलपंपासमोर ज्ञानेश्वर नगरमध्ये मोकळ्या भूखंडावर मोकाट जनावरे होती. या मोकाट जनावरांना संशयित गो-तस्करांनी भुलीचे इंजेक्शन दिले आणि त्यांना पळविण्याचा प्रयत्न केला.

मात्र सदर प्रकार जागरूक सामाजिक कार्यकर्ता शिवा तेलंग यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली. तेलंग यांच्यासह संदीप शेळके, संभाजी पागिरे यांनी धाव घेतली. अचानक आलेल्या तेलंग यांना बघून गो तस्करांनी पलायन केले.

त्यामुळे गोवंशांचे प्राण वाचले. सदर प्रकार त्यांनी मंगलरूप गोशाळेच्या पुरुषोत्तम आव्हाड व सदस्यांना सांगितला. सकाळी सात वाजता मंगलरूप गोशाळेचे सदस्य घटनास्थळी पोचले. यावेळी सातही गोवंश हे शुद्ध हरपलेल्या अवस्थेत होते.

ताबडतोब पशुवैद्यकांना बोलावून सर्व गोवंशाना शुद्धीत येण्यासाठी त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यातील एक गोवंश अत्यंत अत्यवस्थ असल्याने ते मंगलरूप गोशाळेत दाखल करण्यात आले.

stray cows
NMC Employee Strike: महापालिका कर्मचारी संपाच्या तयारीत; आयुक्तांना आज देणार 14 दिवसांची नोटीस

याबाबत इंदिरानगर पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. दरम्यान, रामवाडी परिसरातही गेल्या महिन्यातच अशीच घटना घडली होती.

तर, दुसरी घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून कत्तलीसाठी नेणाऱ्या गो-तस्करांच्या टोळीला जेरबंद करण्याची मागणी मंगलरूप गोशाळेच्या वतीने करण्यात आली आहे.

"जनावरांना इंजेक्शन देताना पाहिल्यावर संशय आला. पोलिसांनी फोन केल्यानंतर आम्ही गेलो तर ते पळून गेले. पोलिसांची टीमही आली होती. पण ते सापडले नाही. पोलिसांनी या टोळीला जेरबंद करण्याची मागणी केली आहे."- शिवा तेलंग, सामाजिक कार्यकर्ता.

stray cows
Nashik News: काँक्रिटीकरणावरून गोदा संवर्धन- पुरोहित संघात मतभेद; निरीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.