Nashik: 1 अधिकाऱ्यावर 7 बिटांचा अतिरिक्त पदभार! बागलाण तालुक्यात शिक्षकांना वर्ग सांभाळून कारभार पाहण्याची वेळ

Teacher
Teacheresakal
Updated on

Nashik News : बागलाण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २९८ शाळा, २१ केंद्र आणि ९ बिट आहेत. सध्या एकच केंद्रप्रमुख तालुक्यात कार्यरत आहेत.

तीन विस्तार अधिकारी असून दोन विस्तार अधिकारी याच्याकडे सटाणा, मालेगाव गटशिक्षणाकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने कार्यरत असलेल्या एकाच विस्तार अधिकारी यांना सात बिटाचा अतिरिक्त पदभार सांभाळण्याची वेळ आली आहे.

पुढील आठवड्यापासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची तालुक्यातील रिक्तपदे भरावी अशी मागणी शिक्षक संघटनांमधून केली जात आहे. (7 bit additional charge on 1 officer In Baglan taluka time for teachers to take charge of classroom Nashik news)

बागलाण तालुक्याचा विस्तार मोठा असून गुजरात राज्यालगत व धुळे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. तालुक्यात पूर्वी सर्व शाळा मिळून २१ केंद्र आणि केंद्रप्रमुख होते.

मात्र टप्प्याटप्प्याने २० केंद्रप्रमुख सेवानिवृत्त झाल्याने एकच केंद्रप्रमुख तालुक्यात कार्यरत आहेत. त्यामुळे २० केंद्रातील कार्यभार सांभाळण्यासाठी पदवीधर शिक्षक व अन्य शिक्षकांना शाळा, वर्ग सांभाळून हा अतिरिक्त कार्यभार पाहावा लागत आहे. यामुळे या कामांचा थेट परिणाम हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागला आहे.

यासह तालुक्यात नऊ बिट असून त्यासाठी चार विस्तार अधिकारी कार्यरत होती. मात्र मागील तीन ते चार वर्षापासून येथील दोन विस्तार अधिकारी यांच्याकडे मालेगाव आणि सटाणा गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher
ITI Admission : राज्यात ITIच्या दीड लाख जागा! यंदाच्या सत्रात प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने

त्यातच एक विस्तार यांची बदली झाल्यामुळे आता दोघा विस्तार अधिकाऱ्यांवर नऊ बिटांचा कार्यभार पाहण्याची वेळ आली आहे. यामुळे अतिरिक्त बिटाचा ताण दोघा अधिकाऱ्यांवर आल्याने त्यांची देखील कामकाज करताना चांगलीच दमछाक होत आहे.

त्यामुळे तालुक्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन तत्काळ ही पदे भरण्याची मागणी आता शिक्षक संघटनांमधून केली जात आहे.

"जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमधूनच केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदे भरावीत ही मागणी शासनाकडे केली होती. दोन महिन्यात ही पदे भरण्यात येणार आहेत."

- अंबादास वाजे, राज्याध्यक्ष शिक्षक संघ.

"जिल्ह्यात बरेच केंद्रप्रमुख सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच विस्तार अधिकारी पदे देखील रिक्त असून शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातून पदोन्नती करावी. जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावर मुले दाखल होतात. तरी संच मान्यता ३० जुनची धरण्यात यावी. यामुळे शिक्षक संख्या कमी होणार नाही." - अर्जुन ताकाटे, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ

Teacher
Token Machine : मका पेरणीसाठी देवळ्यात टोकन यंत्राचा उपयोग! यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांकडून मजुरीत बचत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.