Nashik Corona Update : शहरात 7 कोरोना रुग्ण; महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट!

corona update
corona update esakal
Updated on

नाशिक : मुंबई, पुणे, ठाणे, वाशीम व उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा ॲलर्ट झाली असून त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेलादेखील सूचना करण्यात आल्या.

मागील चार-पाच दिवसात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे वैद्यकीय विभाग पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आला आहे. ज्या भागात रुग्ण आढळला तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून दररोज तीनशे ते चारशे चाचण्या केल्या जात आहे. (7 corona patients in city NMC medical department alert Nashik Corona Update news)

एप्रिल २०२० मध्ये नाशिक शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळला. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहराला कोरोनाने घेरले. बजरंगवाडी, जुने नाशिक असे करत सिडको या दाट लोकवस्तीच्या भागात कोरोना रुग्ण आढळले.

दुसऱ्या लाटेने भयानक स्वरूप धारण करताना ऑक्सिजनची गरज निर्माण केली. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णालय प्रशासनदेखील हतबल झाले. दुसऱ्या लाटेने सर्वाधिक बळी घेतले. तिसरी लाट सौम्य ठरली.

कोरोनामुळे आरोग्य सेवा विस्कळित झाली त्याचबरोबर नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले. चौथ्या लाटेचा प्रभाव दिसला नाही. कोरोना आहे की नाही अशी परिस्थिती असताना मुंबई, पुणे, ठाणे, वाशीम व उस्मानाबाद या शहरांमध्ये रुग्ण वाढू लागल्याची नोंद राज्य शासनाकडे झाली.

पुणे भागात ३५ टक्के, मुंबईत २४ टक्के तर ठाणे शहर व परिसरात १३ टक्के कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे नाशिक महापालिकेलादेखील सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेकडून संभाव्य तयारी सुरू झाली असतानाच मागील चार- पाच दिवसात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने वैद्यकीय विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे.

त्यानुसार ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तेथे तातडीने चाचण्या सुरू झाल्या आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

corona update
Rangpanchami Festival : रंगपंचमीनिमित्त सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना

कॉन्टॅक्ट शोधमोहिम

आययसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वीस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधावे, रुग्णालयांमध्ये कोरोना बेड सज्ज ठेवावे, ऑक्सिजन साठा तपासावा आदी प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून दररोज तीनशे ते चारशे चाचण्या करण्याची मोहीम राबविली जात आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांना गृह विलीगकरणच्या सूचना दिल्या आहेत.

"महापालिका हद्दीत सात कोरोना रुग्ण आढळले आहेत. ते गृह विलीगीकरणात असून, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. महापालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे."

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

corona update
Nashik News : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नरच्या बारा रस्त्यांसाठी 24 कोटी मंजूर

अशी आहे महापालिकेची व्यवस्था

- एकूण खाटा- १२, ६९४
- जनरल खाटा- ४,३१८
- ऑक्सिजन खाटा- ७,१२८
- आयसीयू खाटा- ६४६
- व्हेंटिलेटर खाटा- ६०४

कोविड स्थिती (डिसेंबर २०२२ ची आकडेवारी)

- शहरात बाधित रुग्ण- २, ७६,०४२
- एकूण मृत्यू- ४,१०९ (१.५१ टक्के)
- आरटी- पीसीआरसह अन्य चाचण्या- २०,३७,५७३

corona update
Grapes Crisis : द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले; प्रतिकिलो द्राक्षांच्या तुलनेत रद्दीचा दर दुप्पट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.