Nashik News : रोजगार हमीवरील मजुरांची 7.88 कोटींची मजुरी थकली; मजुरी मिळत नसल्याने मजूर जर्जर

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील ११ हजार मजुरांची गत अडीच महिन्यांपासून ७.८८ कोटींची मजुरी थकली आहे.
7 crore wages of laborers on employment guarantee nashik news
7 crore wages of laborers on employment guarantee nashik newsesakal
Updated on

Nashik News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील ११ हजार मजुरांची गत अडीच महिन्यांपासून ७.८८ कोटींची मजुरी थकली आहे.

रोजगार हमीच्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यात आठवडाभरात रक्कम जमा केली जात असताना केंद्र सरकारने २ नोव्हेंबर २०२३ पासून मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केलेली नाही. (7 crore wages of laborers on employment guarantee nashik news)

यामुळे मजुरांची अवस्था बिकट झाली आहे. वर्षातील किमान १०० दिवस मजुरांना रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केंद्र सरकारने केला आहे. यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम जमा केली जाते. ही रक्कम केंद्र सरकार थेट मजुराच्या खात्यात जमा करते.

रोजगार हमी मजुरांचे पैसे कधीही थांबवले जात नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. मात्र, नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केलेले नाहीत. संकेतस्थळावर काही समस्या असेल, असे गृहित धरले होते. मात्र, आता निम्मा जानेवारी महिना संपला तरीही मजुरांच्या खात्यात रक्कम वर्ग होत नसल्याने मजुरांना उधार-उसनवारीची वेळ आली आहे.

रोजगार हमीवर इतर रोजंदारीच्या कामांपेक्षा कमी रक्कम मिळते. मात्र, वर्षभर काम तसेच प्रत्येक आठवड्याला मिळणारी मजुरी यामुळे मजूर रोजगार हमीला प्राधान्य देतात. मात्र, आता दोन महिन्यांपासून रक्कम थकल्याने मजुरांचे हाल होत आहेत. रोजगार हमी योजनेतून शिवार रस्ते, पाणंद रस्ते, सिमेंट बंधारे, वैयक्तिक लाभाच्या योजना आदी कामे केली जातात.

7 crore wages of laborers on employment guarantee nashik news
Nashik News : मनमाडला वाहतूक कोंडीचा त्रास; नगिना मशिदीजवळ तयार झाला ब्लॅक स्पॉट

या कामांमध्ये ६० ते ९० टक्क्यांपर्यंत कुशल व उर्वरित अकुशल कामे होतात. त्यातील कुशल कामाची रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते. जिल्ह्यातील कुशलच्या कामांची ७.८८ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकीत आहेत. यामुळे योजनेतून केली जाणारी सर्वच कुशल, अकुशल कामे अडचणीत आली आहेत.

स्थलांतर वाढण्याची शक्यता

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती आहे. जानेवारीपासूनच दुष्काळ झळा ग्रामीण भागात जाणवू लागल्याने रोजगार हमीच्या कामांवर मजुरांची मदार होती. मात्र, केलेल्या कामाची मजुरी मिळत नसल्याने आगामी काळात काम मिळण्याची शक्यता कमी असल्याने मजुरांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय थकीत मजुरी (रुपयांत)

बागलाण (१ कोटी १ हजार), चांदवड (१५.५३ लाख), देवळा (१६.४८ लाख), दिंडोरी (६२.७१ लाख), इगतपुरी (३० लाख), कळवण (७७.६०लाख), मालेगाव (७८.५५ लाख), नांदगाव (१ कोटी तीन हजार), नाशिक (५.२२ लाख), निफाड (३३.०९ लाख), पेठ (४६.५४लाख), सिन्नर (४७.३१ लाख), सुरगाणा (७१.३० लाख), त्र्यंबकेश्वर (५२.९८ लाख), येवला (४५.७२ लाख).

7 crore wages of laborers on employment guarantee nashik news
Nashik News : अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर मिरर! कळवणला संकल्प ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()