नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून स्मार्ट पार्किंगचा बोजवारा उडाला असताना आता महापालिकेनेच पार्किंगची व्यवस्था लावण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यात नव्याने गठित करण्यात आलेल्या वाहनतळ समितीने एआर अर्थात समावेशक आरक्षण अंतर्गत विकसित झालेल्या चार व गोदावरी नदी किनाऱ्यावरील दोन, तर भालेकर हायस्कूलच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये एक असे सात वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. (7 parking lots will be developed in city municipality will solve problem nashik news)
शहराचा विस्तार वाढत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडतं आहे. त्यामुळे खासगी वाहने वापरण्याकडे कल वाढला आहे. परंतु वाहने वाढत असली तरी बाजारपेठेच्या भागात वाहने लावण्यासाठी जागा नाही.
सार्वजनिक रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात. परिणामी वाहतूक ठप्प होणे, पायी चालणाऱ्या नागरिकांना चालण्यास रस्ता न मिळणे, शहराचे विद्रूपीकरण या समस्यांना तोंड द्यावे लागते. वास्तविक पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.
परंतु या यंत्रणेकडून जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडली जात नाही. स्मार्टसिटी कंपनीकडून ऑफलाइन व ऑनलाइन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु दिल्ली स्थित कंपनीने कोरोनाकाळातील बंदमुळे स्मार्टसिटी कंपनीकडे अधिकचा दर मागितला.
त्यामुळे व्यवहार फिसकटला. पार्किंगची समस्या जैसे-थे असल्याने आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी वाहनतळ समिती गठित केली. समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी वाहनतळासाठी उपाययोजना सुचविण्यात आला.
त्यात प्रमुख रस्त्यांवर समावेशक आरक्षणाच्या प्रयोजनाखाली महापालिकेला मिळालेल्या वाहनतळाची जागा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाहनतळ समितीने समावेशक आरक्षणांतर्गत विकसित झालेल्या चार व गोदावरी नदी किनाऱ्यावरील दोन, तर भालेकर हायस्कूलच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये एक असे सात वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याच बरोबर स्मार्टसिटी कंपनीने ‘पीपीपी’ तत्त्वावर ३३ ठिकाणी पार्किंग व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने वकिलांचा सल्ला घेऊन नव्याने वाहनतळ विकसित केली जाणार आहे.
या जागांवर होणार सर्वसमावेशक पार्किंग
- बी.डी. भालेकर हायस्कूल मैदान, श्री म्हसोबा महाराज पटांगण, कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका, मेन रोड, सीता गुंफा, यशवंत महाराज पटांगण.
७५० वाहनांची व्यवस्था
पहिल्या टप्प्यात सात वाहनतळ विकसित केली जाणार आहे. त्यात साधारण साडेतीनशे चार चाकी तर पाचशे दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ऑन रोड व ऑफ रोड पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.
"वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहनतळ विकसित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्वसमावेशक आरक्षणे विकसित करून त्यात पार्किंगची व्यवस्था केली जाईल."
- प्रशांत पाटील, उपायुक्त, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.