World Cup 2023 : क्रिकेट विश्वकरंडकामधील नऊ साखळी सामने जिंकल्यानंतर उपांत्य फेरीतही भारताने बाजी मारली. यापूर्वी साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने अंतिम सामनादेखील भारतीय संघाच्या खिशात जाईल, असा अंदाज सट्टा बाजारात लागला. (70 crore loss in Nashik betting market due to India defeat in world cup news)
मात्र ढेपाळलेली भारतीय फलंदाजी व शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी केलेली टोलेबाजी यामुळे नाशिकच्या सट्टा बाजारात तब्बल ७० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
विश्वकरंडक क्रिकेटचा अंतिम सामना सुरू झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने तुफान टोलेबाजी सुरू केली. पहिल्या दहा षटकांमध्ये ८० धावा फटकावल्या. नंतर सट्टा बाजारात भारतीय संघाचा दर शंभर रुपयाला ३६ रुपयांपर्यंत पोचला. मात्र त्यानंतर पाठोपाठ तीन विकेट गेल्यानंतर भारतीय संघाचा भाव वाढण्यास सुरवात झाली.
धावांची गती मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने भारतीय संघाकडून सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे घटले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची बॅटिंग सुरू झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी लागोपाठ तीन महत्त्वाचे फलंदाज टिपल्यानंतर भारतीय संघाचा भाव शंभर रुपयाला ४४ रुपयांपर्यंत येऊन पोचला.
यादरम्यान भारतीय गोलंदाज आणखी मोठी करामत करून भारताला विश्वकरंडक जिंकून देतील, या आशेने काही काळापुरता दर कायम राहिला. मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तुफान टोलेबाजी केल्याने भारतीय संघाला सामना गमवावा लागला. याच कालावधीमध्ये नाशिकच्या सट्टा बाजारात जवळपास ७० कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.