Nashik News: निफाड तालुक्यात खरिपासाठी 75 टक्के पीककर्जवाटप; जिल्हा बँकेतून कर्ज घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला

While informing the farmers about the facilities of the District Bank, the Divisional Officer D. K. Jagtap
While informing the farmers about the facilities of the District Bank, the Divisional Officer D. K. Jagtapesakal
Updated on

Nashik News : निफाड तालुक्यात अद्याप पावसाची अपेक्षित बरसता होऊन शेतशिवार ओलेचिंब झाले नसले तरी खरिपाची पूर्वतयारी शेतकऱ्यांनी केलेली दिसते. खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते, औषधे व मजुरीसाठी लागणारे आर्थिक भांडवलासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे.

आतापर्यंत तब्बल ७५ टक्के कर्ज वितरण जिल्हा बँकेच्या माध्यमातून झाले आहे. ११ हजार ६४२ सभासद शेतकऱ्यांनी १५१ कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. शेतकऱ्यांचा पुन्हा जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्याकडे कल दिसू लागला आहे. (75 percent crop loan allocation for Kharipa in Niphad taluka tendency of farmers to take loans from district banks increased Nashik News)

जिल्हा बँकेने यंदा निफाड तालुक्यात खरीप हंगामासाठी डिसेंबर २०२३ अखेर १७६ कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पावसाने दडी मारली असली तरी शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली आहे.

पाऊस येणारच आहे... त्यामुळे पीक घेण्यासाठी लागणारे भांडवल हाती असावे म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज उचलले आहे.

सुमारे ४० हजार हेक्टरवर निफाड तालुक्यात मका, सोयाबीन, टोमॅटो आदी पिके घेतली जातात. द्राक्षबागाच्या ऑक्टोबर छाटणीसाठी कर्ज उचलेले जात आहे. सध्या पावसाने दडी मारली असली तरी पेरणीची लगबग सुरू आहे.

दोन हजार शेतकरी जिल्हा बँकेचे नव्याने सभासद

जिल्हा बँकेकडून वेळेत कर्जपुरवठा होत नसल्याने तीन वर्षांपूर्वी शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज घेण्यासाठी पसंती देत होते. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने शेतकऱ्यांना जलद गतीने कर्जपुरवठा होऊ लागला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While informing the farmers about the facilities of the District Bank, the Divisional Officer D. K. Jagtap
Chhagan Bhujbal Latest News : 42 गावांच्या सरपंच, लोकप्रतिनिधींचा भुजबळ यांच्या निर्णयाला पाठिंबा

कमी कागदपत्रांत व कोणतेही छुपे व्याजदर नसल्याने शेतकरी पुन्हा जिल्हा बँकेला पसंती देऊ लागले आहे. यंदा निफाड तालुक्यात वसुलीचे प्रमाण ५६ टक्क्यांवर पोचले आहे. १३२ पैकी ५२ विविध कार्यकारी सोसायट्या बँक पातळीवर १०० टक्के वसुली झाली आहे.

सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी यंदा पुन्हा जिल्हा बँकेचे सभासद होऊन कर्ज उचलले आहे. सभासदहिताच्या विविध योजना राबविल्याचा हा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

आकडे बोलतात...

जिल्हा बँकेकडून खरिपासाठी कर्ज वितरण ः शेतकरी- ११ हजार ६४२, रक्कम- १५१ कोटी रुपये

"जिल्हा बँकेत सरळ व्याजदर आहे. कमी कागदपत्र लागतात. शिवाय समोपचार कर्ज परतफेड योजना, संस्थांसाठी चार टक्के व्याज सवलत योजना राबविल्याने जिल्हा बँकेकडे कर्ज मागणीचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर महिन्यापूर्वीच खरीप हंगामाचे निफाड तालुक्यात १७६ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल."

- डी. के. वाटपाडे, विभागीय अधिकारी, जिल्हा बँक, पिंपळगाव बसवंत

While informing the farmers about the facilities of the District Bank, the Divisional Officer D. K. Jagtap
Dhule News: प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मंजुरी कधी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.