Nashik News : दिंडोरी- पेठ मतदारसंघासाठी 78 कोटी; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे झिरवाळांचे आवाहन

Narhari Zirwal
Narhari Zirwalesakal
Updated on

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना ७८ कोटी ८० लाख निधीच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली. (78 crores for Dindori Peth Constituency narhari zirwal appeals to complete work before monsoon Nashik News)

जानोरी - ओझर राष्ट्रीय विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग ३- रा. मा. २७ चौपदरी रस्त्यासाठी ४ कोटी ५० लाख, खेडगाव ते शिंदवड - १ कोटी ५० लाख, विळवंडी - कोचरगाव - नाळेगाव - उमराळे - दिंडोरी- ४ लाख, दिंडोरी - पालखेड - जोपूळ - पिंपळगाव बसवंत- सहा कोटी ५० लाख,

ढकांबे - आंबेदिंडोरी - जानोरी ते रा. म. रस्त्याची सुधारणा करणे - ४ लाख, कोशिंबे फाटा ते लखमापूर - वरखेडा -खेडगाव ते चांदवड तालुका हद्द-५ लाख, बोपेगाव (प्र.जि.मा ११) पासून जोपूळ - खडकसुकेणे - मोहाडी - गणोरवाडी - आंबेदिंडोरी -खतवड - रासेगाव ते रा. मा. ४८ ला मिळणारा रस्त्याची सुधारणा करणे -४ कोटी ५० लाख,

म्हसरुळ - वरवंडी - शिवनई - आंबेदिंडोरी - जानोरी ते रा. मा. ३७ मिळणारा रस्ता २ कोटी ५० लाख, नळवाडपाडा ते चौधरी वस्ती कोकणगाव खु. रस्त्यावर लहान पुलाचे व पोहोच मार्गाचे बांधकाम करणे - ९५ लाख, शिवारपाडा ते बाडगीचापाडा या रस्त्यावर लहान मुलाचे बांधकाम करणे - १ कोटी ९० लाख,

जुने धागूर ते नळचीवाडी रस्त्याची सुधारणा करणे - ९० लाख, प्र.जि.मा. ४३ ते श्रीरामनगर रस्त्यांवर लहान पुलाचे बांधकाम करणे - २२० लाख, कसबेवणी ते विश्राम बागपाडा रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे - ३ कोटी ५० लाख, राजपाडा ते जिरवाडे रस्त्यांवर लहान पुलाचे बांधकाम करणे - १ कोटी ५० लाख,

राष्ट्रीय महामार्ग ९५३ ते जीरवाडे रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे - १ कोटी २० लाख, मोहाडी - सोनेवाडी ते पालखेड कॉलनी रस्त्याची सुधारणा करणे - २ कोटी ५० लाख, गवळवाडी गेट ते मातोरी शिव रस्ता सुधारणा करणे - ३ कोटी ५० लाख, करंजाळी - कोहोर - हरसुल रस्त्याची सुधारणा करणे - ९० लाख,

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Narhari Zirwal
Chhagan Bhujbal | पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता प्रकल्प अहवाल बनविणार : भुजबळ

कहांडोळपाडा गाव (ता. पेठ) जोडणारा मोहपाडा ते देवळाचापाडा रस्ता येथे दमणगंगा नदीवर मोठा पूल बांधणे -११ कोटी ३५ लाख, प्र. जि.मा. ते भायगाव रस्ता २ लाख, करंजाळी - हरसूल रस्त्याची पुलाचे बांधकाम करणे - २ लाख,

प्र. जि. मा. ११ ते गोंदे रस्त्याचे बांधकाम करणे - २ कोटी ५० लाख, उस्थळे - एकदरे ते जामुळमाळ येथे रस्ता -२ लाख, देवगाव ते बर्डापाडा रस्ता सुधारणा करणे -१ कोटी ५० लाख, रा. म. मा. ८४८ ते बोरवठ रस्ता - १ कोटी ४० लाख, प्र. जि. मा. कोहोर ते रुईपेठा रस्ता बांधकाम करणे व लहान पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५० लाख.

कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

मतदारसंघातील यापूर्वी मंजूर असलेली विविध विकासकामे, रस्त्यांची कामे सुरू आहे. मात्र, ती निधी अभावी रखडली होती. त्या कामांना काही अंशी निधी वर्ग झाला आहे.

तरी ठेकेदारांनी त्वरित कामे सुरू करून कामांचा दर्जा राखावा आता मंजूर झालेल्या कामांची प्रशासकीय कार्यवाही टेंडर प्रक्रिया अधिकाऱ्यांनी त्वरित पूर्ण करत कामे सुरू करून पावसाळा पूर्वी कामे पूर्ण करावी असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे.

Narhari Zirwal
Nashik News : जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत आमदार दराडेंची पेन्शन न घेण्याची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.