Nashik: कसमादेत 10 वर्षात 78 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू; गिरणा नदी पात्रात स्टंटबाजीने अनेकांनी गमावला जीव

Young people sitting on the wall of Kolhapur dam in Girna river basin in Malegaon
Young people sitting on the wall of Kolhapur dam in Girna river basin in Malegaonesakal
Updated on

Nashik News : कसमादे परिसरातील गिरणा, मोसम, आरम या प्रमुख नद्यांसह मोठी धरणे आहेत. गिरणा नदीवर येथील गिरणा पुलाजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. दरवर्षी गिरणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी येथील नागरिक गर्दी करतात.

काही तरुण स्टंटबाजी करत बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाण्यात उड्या मारतात. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो.

गिरणा नदीसह कसमादेतील विविध जलाशयांमध्ये गेल्या दशकात ७८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यृ झाला तर ३५ जणांचे प्राण वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. (78 drowned in Kasmadeh in 10 years Many people lost their lives due to stunts in Girna river bed Nashik)

शहरात शुक्रवारी बाजाराच्या दिवशी यंत्रमाग कारखान्यांसह लहान मोठे उद्योग व्यवसाय बंद असतात. बहुतेक तरुण सुट्टीचा आंनद लुटण्यासाठी गिरणा धरण, तळवाडे साठवण तलाव, गिरणा व मोसम नदी पात्रात फिरायला जातात.

कोल्हापूर बंधाऱ्यामुळे गिरणा पुलाजवळ नदी पात्रात कायम पाणी असते. अनेकजण नदी पात्रात पोहतात. पावसाळ्यात गिरणा नदी महिना-दोन महिने हमखास वाहते. यासह नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात आला आहे.

दाभाडी रोकडोबा शिवार ते गिरणा पुलापर्यंत वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे व पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक जण पाण्यात बुडून मरण पावतात.तसेच पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू होतो.

दरवर्षी पावसाळ्यात येथे अशा स्वरूपाच्या घटना घडतात. विशेष म्हणजे १५ ते २५ वयोगटातील तरुणांचा यात समावेश आहे.

प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना व इशारांना तरुण जुमानत नाहीत. अनेकवेळा तात्पुरत्या स्वरूपाचा पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत. प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत.

यातच गिरणा पुलाजवळील कोल्हापूर बंधारा पोहण्याचे केंद्र बनला आहे. येथूनच अनेकजण पोहताना पूरपाण्याच्या प्रवाहात वाहून जातात. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेकवेळा कसरत करून त्यांचा मृतदेह शोधून काढला आहे.

"दरवर्षी शहरात तरुण मुले बुडण्याचे प्रमाण खूप आहे. यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. जेणे करुण मुलांचे प्राण वाचतील. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे. मुलांना पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल स्वीमिंग पुलाचा पर्याय निवडावा. महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभाग तत्पर आहे."

- संजय पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी, मालेगाव.

"शहरात गिरणा व मोसम नदी, दरेगाव हिल स्टेशनच्या पाठीमागील बंधाऱ्यात अनेक तरुण बुडाले आहेत. गिरणा धरणातही तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात १५ ते २२ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवून त्यांना पूर पाण्यात पोहण्यास प्रतिबंध करावा. यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनाही जनजागृतीसाठी पुढे यावे."

- शकील तैराक, जलपटू मालेगाव

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Young people sitting on the wall of Kolhapur dam in Girna river basin in Malegaon
Accident : ग्रेटर नोएडामध्ये मोठा अपघात! बांधकामादरम्यान लिफ्ट कोसळली, चार कामगारांचा मृत्यू

वर्ष बुडताना वाचविलेले प्राण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेले

२०१२ ० ६

२०१३ ५ ७

२०१४ ६ ५

२०१५ ० ४

२०१६ ६ १२

२०१७ १ ९

२०१८ १५ ३

२०१९ १ ९

२०२० ० ८

२०२१ ० ३

२०२२ १ १२

एकूण ३५ ७

Young people sitting on the wall of Kolhapur dam in Girna river basin in Malegaon
Jalgaon Crime News : कुंटणखाना प्रकरणात चौघांना कोठडी; तरुणींची शासकीय सुधारगृहात रवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.