Abhay Yojana: अभय योजनेंतर्गत 785 नळजोडणी अधिकृत; अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई

NMC Abhay Yojana
NMC Abhay Yojanaesakal
Updated on

Abhay Yojana : पाणीगळती व चोरी रोखण्यासाठी महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेअंतर्गत ७८५ नळजोडणी नियमित करण्यात आल्या आहेत. महापालिकेला जवळपास दहा हजार नळजोडणी नियमित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र अभय योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आता विविध कर विभागाकडून अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई केली जाणार आहे. (785 taps authorized under Abhay Yojana Action for failure to receive expected response nashik)

नाशिक महापालिकेला जीएसटी व घरपट्टी पाठोपाठ पाणीपट्टीतून महसूल प्राप्त होतो. मात्र पाणीपट्टीतून प्राप्त होणारा महसूल उद्दिष्टापेक्षा फारच कमी आहे. यातून पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्चदेखील वसूल होत नाही.

किमान ना- नफा व ना- तोटा तत्त्वावर का होईना पाणीपुरवठा योजना चालविण्याची महापालिकेची धडपड आहे. घरपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात सवलत योजना लागू केली आहे.

या वर्षी जवळपास ९१ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याने त्याच धर्तीवर घरपट्टी वसूल करण्याबरोबरच पाणीगळती रोखण्यासाठी अभय योजना जाहीर केली. त्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ८७१ अर्ज प्राप्त झाले.

त्यातील ७८५ नळजोडणी नियमित करण्यात आल्या. त्यातून १६ लाख ६२ हजार रुपयांचे दंडात्मक शुल्क आकारण्यात आले आहे.

अपेक्षित वसुली करण्यासाठी आता घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटपाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी शोधल्या जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Abhay Yojana
NMC News: घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी वितरण व्यवस्थेचे खासगीकरण!

अनधिकृत नळजोडणीचे नियमितीकरण

विभाग नियमितीकरण

पूर्व ३०६

पश्चिम ४७

पंचवटी १७५

नाशिक रोड १८०

सातपूर ७२

सिडको ०५

NMC Abhay Yojana
National Sports Day: भारताला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा नाशिकचा खेळाडू करतोय मजुरी; राज्य शासनाचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.