Nashik Crime News : हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यानेच लांबविली सुमारे 8 लाखांची रोकड

Theft
Theftesakal
Updated on

नाशिक : सिडकोतील भुजबळ फार्म परिसरात असलेल्या दूर्गा आय हॉस्पिटलमधीलच कर्मचाऱ्याने ५ लाखांच्या रोकडसह हॉस्पिटलच्या हिशोबातील सुमारे ३ लाख असा ८ लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरचा प्रकार हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला आहे.

आकाश लक्ष्मण काळे (२४, रा. जेजुरकर वस्ती, हनुमंत गाव, अहमदनगर) असे संशयित कर्मचारयाचे नाव आहे. डॉ. सोनिया चंद्रशेखर भाला (रा. गणेश सिग्नेफिया, वडाळागाव) यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. भाला यांचे भुजबळ फार्म परिसरात दूर्गा आय हॉस्पिटल आहे. गेल्या १० नोव्हेंबर रोजी त्यांना त्यांच्य अकोला या मुळगावी जायचे असल्याने त्या घरातून पाच लाखांची रोकड पर्समध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्या.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सदरची पर्स त्यांनी त्यांच्या कॅबिनला ठेवली आणि दिवसभर हॉस्पिटलच्या कामात गुंतल्या. सायंकाळी त्यांच्या वाहनचालकाला पैसे द्यायचे असल्याने त्यांनी कॅबिनमधील पर्स पाहिली असता त्यातील ५ लाखांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही तपासले असता, त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये डोळे तपासण्याचे काम करणारा संशयित आकाश काळे यानेच पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले.

Theft
Nashik News : निफाड, दिंडोरी तालुक्यांत फुलल्या द्राक्षबागा; शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा

तसेच, डॉ. भाला यांनी हॉस्पिटलचा मागील हिशोब तपासला असता, संशयिताने २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दहा दिवसात २ लाख ८३ हजार रुपयांची रक्कमही हडप केल्याचे समोर आले. त्यानुसार, संशयित काळे याने ७ लाख ८३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार, अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.