चिमुरड्याने गिळले नेलकटर; MVP वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी शस्त्रक्रिया

MVP Hospital News
MVP Hospital Newsesakal
Updated on

नाशिक : लहान मुल हाताला लागेल ते तोंडात घालतात आणि गिळून घेतात. नाणे गिळल्याने तर अनेक प्रकार घडलेले असताना अवघ्या आठ महिन्याच्या चिमुरड्याने नेलकटरच गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बाळाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर सदरची बाब लक्षात आल्यामुळे वेळीच मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात जटील शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेत अडकलेले नेलकटर काढण्यात आले. नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या चिमुरड्याने नेलकटर गिळंकृत केले होते. (8 month Girl swallowed nail cutter Successful surgery at MVP Medical College Nashik Latest Marathi News)

नाशिकरोड परिसरात शिंदे कुटूंबिय राहतात. त्यांच्या आठ महिन्याच्या चिमुरड्याने सोमवारी (ता.१९) सायंकाळी घरात रांगत असताना त्याच्या हाती नेलकटर लागले. चिमुकल्याने ते खेळता-खेळता तोंडात चघळत-चघळत गिळून घेतले. नेलकटर त्याच्या घशात अडकले. त्याला श्‍वास घेता येईना, त्यामुळे ते रडू लागले. सदरची बाब त्याच्या आईच्या लक्षात आले त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यास उपचारासाठी आणले.

बाळावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यास तातडीने आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैदयकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी सोमवारी (ता.१९) रात्री उशिरा बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जटील शस्त्रक्रियेतून बाळाच्या अन्ननलिकेत अडकलेले सदरील नेलकटर यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळे बाळाला एकप्रकारे जीवदानच मिळाले.

MVP Hospital News
ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा; उजनीत 12 हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

पालकांनी सजग रहावे

घरात रांगते लहान मुल असेल तर पालकांनी सजग राहून काळजी घेणे गरजेचे असते. लहान मुलांच्या जे काही हाती लागेल ते तोंडात घालण्याची वा गिळून घेण्याची सवयच असते. शेंगदाणे, दाणे, नाणे यासह एखादे झाकण, चेंडू, पेन, पेनाचे टोपण, शर्टाची गुंडी, चावी आदी वस्तू ते तोंडात घालतात आणि बऱ्याचदा गिळूनही घेतात.

अलिकडे तर मोबाईल चार्जरची वायर वा गुडनाईट लिक्विड गिळल्याने दूर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनी घरात लहान बाळ असेल तर त्यांच्याकडे सजगपणे लक्ष द्यावे, असे आवाहन डॅक्टरांनी केले आहे.

MVP Hospital News
Bogus Medical Certificate : रेकॉर्डअभावी चौकशी समितीचे काम रेंगाळले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.