जिल्ह्यात आणखी 8 धान्य गुदाम; धान्याची साठवण क्षमता होणार चौपट

food grain storage latest marathi news
food grain storage latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात तेरा तालुक्यातील गुदामाशिवाय आणखी नवीन आठ गुदामांचे (warehouse) काम अंतिम टप्प्यात आल्याने जिल्ह्यातील धान्य साठवणूक (Grain storage) क्षमता चौप्पट वाढणार आहे. तसेच त्यामुळे धान्य खराब होण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. (8 more grain warehouses in district Storage capacity of grain will be four times more nashik Latest Marathi News)

food grain storage latest marathi news
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे पुन्हा कोविड सेंटरमध्ये रूपांतर

जिल्ह्यात शासकीय धान्य खराब होण्याच्या प्रचंड तक्रारी होत्या. त्यावर उपाय काढताना पुरवठा विभागाने दोन वर्षात जिल्ह्यात धान्य साठवण गुदाम उभारणीला प्राधान्य दिले. त्यातून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ गुदामांचे बांधकाम पूर्ण झाले असतांना नव्याने आणखी आठ गुदाम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे धान्य खराब होण्याचा प्रश्न कायमच सुटणार आहे.

नाशिकला तीन, येवला नांदगाव, पिंपळगाव प्रत्येकी एक, मालेगाव दोन या प्रमाणे नव्याने आठ धान्य साठवणुकीचे गुदाम उभारण्यात येत आहे. जिल्ह्यात तेरा तालुक्यात यापूर्वीच गुदाम उभारले असतांना नव्याने आणखी आठ गुदाम उभारण्याने जिल्ह्यात गुदामांची संख्या २१ होणार आहे.

धान्य साठवणूक क्षमता वाढविताना त्यांची सुरक्षा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान्य साठवणुकीची क्षमता १७ हजार टनाहून थेट ६८ हजार टन इतकी होणार आहे.

food grain storage latest marathi news
महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.