Nashik: हंगामाच्या पहिल्या गणनेत 8 हजार पक्ष्यांची नोंद; पक्षीतीर्थमध्ये हिवाळी ‘पाहुण्यां'चा वाढला किलबिलाट

Munia and Blue-necked Vulture found in the first count of this season at the bird sanctuary on Sunday.
Munia and Blue-necked Vulture found in the first count of this season at the bird sanctuary on Sunday.esakal
Updated on

Nashik News : मोकळ्या आकाशात भरारी घेणारा दलदल ससाणा... समाधी लावून उभा असलेला राखी बगळा... कपाळावर पांढरा टिळा लावलेला वारकरी बदक अन गाळपेऱ्यात मस्ती करणारा वेडाराघू... हे दृश्‍य पाहावयास मिळालंय, नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) येथील पक्षीतीर्थात.

निमित्त होतं, यंदाच्या हंगामातील आज पहिल्या झालेल्या पक्षीगणनेचे. त्यात ५५ जातींचे चार हजार ८९५ पाणपक्षी; तर दोन हजार ७५० झाडांवरील अशा एकूण सात हजार ६४५ पक्ष्यांची नोंद झाली. (8 thousand birds recorded in first count of season chirping of winter guests increased in nandurmadhyameshwar Nashik)

अभयारण्यातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी आदी सात ठिकाणी मनोऱ्यावर करण्यात आलेल्या पक्षीगणनेत राखी बगळा, रंगीत करकोचा, पर्पल हेरॉन, खंड्या, दलदल ससाणा, चमचा, पाणकावळे, कमळ पक्षी, जांभळी पान कोंबडी, मुनिया, वारकरी, हळदी-कुंकू, थापट्या, गार्गणी आदी पक्षी आढळले. ‘ब्लॅक इगल’चे पहिल्यांदा इथे दर्शन घडले.

‘पाहुण्यांच्या’ हिवाळ्यातील आगमनाची तयारी वन विभागाकडून सुरू झाली असून, पक्षी निरीक्षणासाठी येथे निरीक्षण मनोरे, ‘स्पोटिंग स्कोप’ अशा सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पक्षी गणनेत प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक शेखर देवकर, वनरक्षक संदीप काळे, आशा वानखेडे, पक्षीमित्र अनंत सरोदे, मनोज वाघमारे, गणेश वाघ, डॉ. उत्तम डेर्ले, अनिरुद्ध जाधव, चिंतामण जाधव, पार्थ जाधव, केशव नाईकवाडे, गाईड अमोल दराडे, गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, रोषण पोटे, पंकज चव्हाण, विकास गारे, रोहित मोगल, सुनील जाधव आदींचा सहभाग राहिला.

"हिवाळ्यात पक्षी अभयारण्यात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात. चार महिन्यांत परिसरात किती पक्ष्यांनी हजेरी लावली, हे समजावे म्हणून वन विभागातर्फे पक्षी गणना करण्यात येते. यंदा एक महिना अगोदर स्थलांतरित पक्षी आल्याचे पक्षी गणनेत आढळले."

- शेखर देवकर, प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक, नाशिक

Munia and Blue-necked Vulture found in the first count of this season at the bird sanctuary on Sunday.
Dhule Navratri Festival: जिल्हावासीयांना आदिशक्तीच्या आगमनाचे वेध; विविध रूपांतील मूर्ती अन इतर साहित्य विक्रीस

गणनेत आढळलेल्या पक्ष्यांची संख्या

० वारकरी : ४००

० हळदी-कुंकू : १५०

० मुनिया : ६००

० दलदल ससाणा : ६

० जांभळी पान कोंबडी : ३५०

० राखी बगळा : ४०

० रंगीत करकोचा : ५५

० निळ्या गळ्याचा वेडाराघू : ३००

० थापट्या : ६

० गप्पीदास : १२०

Munia and Blue-necked Vulture found in the first count of this season at the bird sanctuary on Sunday.
October Heat: ऑक्‍टोबर हीटचा नाशिककरांना तडाखा! भरपूर पाणी पिण्याबरोबर उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()