Saptashrungi Gad News : सप्तशृंगगडाच्या विकासाचा 81 कोटींचा आराखडा मंजूर; आमदार पवार यांच्या मागणीला यश

Saptashrungi Devi Wani gad
Saptashrungi Devi Wani gadesakal
Updated on

Saptashrungi Gad News : देश व राज्यभरातून भाविक सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विकासकामे करणे महत्त्वाचे असल्याने हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील जाहीर सभेत दिले होते.

त्यानुसार शब्द पाळत श्री. पवार यांनी आज झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सप्तशृंगगड विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ८१ कोटी ८६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. (81 crore plan approved for development of Saptshringigarh nashik news)

२०१९ मध्ये विकास आराखडा २०.२५ कोटींचा मंजूर करण्यात आला होता. आता नव्याने ८१ कोटी ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी नव्याने शासनाला सादर केला आहे. सुधारित आराखडा २५ कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे विकास आराखडा हस्तांतरित करण्यात आला आहे. या प्रश्नासंदर्भात कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार हे आग्रही असल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाची अनोखी भेट दिल्याचे मानले जात आहे.

आमदार नितीन पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शेतकरी व कृतज्ञता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार हे शनिवारी कळवणला आले होते. मेळाव्यात आमदार पवारांनी कळवण व सुरगाणा तालुक्यांतील विविध विकासकामांच्या मागणीबरोबर सप्तशृंगगड परिसर विकास आराखड्याला मंजुरी देण्याची आग्रही मागणी करून लक्ष वेधले होते.

Saptashrungi Devi Wani gad
Nashik News: गोदा महाआरतीचा प्रस्ताव धूळखात; सिंहस्थापूर्वी आरती सुरू करण्याची भावना शासन कधी विचारात घेणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतर मागण्या मान्य करताना गड परिसराच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्याबाबत शनिवारी मेळाव्यात आश्वस्त केले होते. आज सोमवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे आमदार पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विकास आराखड्याला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सप्तशृंगगड तीर्थक्षेत्र स्थळाला मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा शासनास सादर केला होता. आमदार नितीन पवार यांनी सप्तशृंगगडावरील सुचविलेल्या विकासकामांचा आराखड्यात समाविष्ट करण्यात येऊन उच्चाधिकार समितीने दिलेल्या सूचनांप्रमाणे मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा अंदाजपत्रकासह ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आला होता.

Saptashrungi Devi Wani gad
World Mental Health Day : उपचारापासून वंचित 40 टक्क्‍यांहून अधिक मानसिक रुग्‍ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.