Nashik Kumbh Mela: सिंहस्थाचा आराखडा 8117 कोटींचा; समन्वय समिती ठरविणार आराखड्याचे भवितव्य

kumbh mela latest marathi News
kumbh mela latest marathi Newsesakal
Updated on

Simhastha Kumbh Mela : २०२७ मध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून महत्त्वाच्या विभागांचा एकूण ८ हजार ११७ कोटी रुपयांचा आराखडा निश्‍चित झाला आहे. यात भूसंपादन विभागासाठी निधीची तरतूद धरण्यात आली नाही, परंतु दुसरीकडे भूसंपादनासाठी स्वतंत्र निधी मागण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. राज्य शासनाकडून समन्वय समिती गठित केली जाईल. समितीच्या भूमिकेवर आराखड्याचे भवितव्य ठरणार आहे.

२०२७-२८ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविक व साधू, महंतांना सुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने आराखडा तयार केला आहे.

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक महापालिकेची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे महापालिकेकडून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. (8117 crores of Simhastha plan nashik kumbh mela news)

आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करण्यात आली. समितीकडून ४२ विभागांकडून विकास आराखडा मागविण्यात आला. त्यात बांधकाम विभागाने ३७३० कोटी रुपये, मलनिस्सारण विभागाकडून २४७१ कोटीचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला.

आरोग्य व वैद्यकीय, अग्निशमन, उद्यान, पाणीपुरवठा, जनसंपर्क, घनकचरा विभागाकडूनही खर्चाची आकडेवारी सादर करण्यात आली. त्या वेळी ८ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा आहे. वाराणसी येथे २०२५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तेथील उपाययोजनांच्या धर्तीवर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महापालिकेचे पथक यापूर्वी एकदा भेट देवून गेले. कामे सुरू होण्यापूर्वी आणखी एक भेट पथक देणार आहे. गोदावरी नदीकाठी घाट विकास, प्रदूषणमुक्ती, मलनिस्सारण केंद्रांच्या सक्षमीकरणावर या माध्यमातून भर दिला जाणार आहे.

भूसंपादनाचा स्वतंत्र आराखडा

भूसंपादनासाठी स्वतंत्र ३ हजार कोटींचा आराखडा सादर होण्याची शक्यता आहे. भूसंपादनाच्या ३ हजार कोटींच्या रक्कमेचा समावेश झाल्यास जवळपास ११ हजार कोटींच्या वर आराखडा जाणार आहे.

kumbh mela latest marathi News
Nashik News: चूक लक्षात येताच ‘प्रिंटिंग मिस्टेक’चा दावा; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर सरपंच परिषदेची सारवासारव

दरम्यान बांधकाम व ड्रेनेज विभागाच्या आराखड्यात जवळपास दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. अर्थात सरकारकडून किती प्रमाणात निधी मंजूर होतो, त्यावर आराखड्याचे भवितव्य अवलंबून आहे.

असा आहे विभागनिहाय खर्चाची तरतूद (कोटीत)

विभाग अपेक्षित खर्च

बांधकाम विभाग ३७३०.५०

पाणीपुरवठा व यांत्रिकी १०००

विद्युत विभाग ११६.६०

सार्वजनिक आरोग्य, ड्रेनेज २४९१.२१

वेस्ट मॅनेजमेंट १५१.३६

वैद्यकीय ५३२.५८

आपत्कालीन व्यवस्था ६३.२३

उद्यान २३.५०

माहिती व जनसंपर्क ८.७८

सिटीलिंक (बससेवा) १४२८.३७

एकूण ८११७.७६

kumbh mela latest marathi News
Gas Leakage: सिलिंडर गळतीतून 20 बळी; गांभीर्यता नसल्याने घटनांमध्ये वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.