RTE Admission : आरटीई प्रवेशाचे शासनाकडे थकले 81.69 कोटी! जिल्ह्यात 4 वर्षांपासून प्रतीक्षा

RTE Admission
RTE Admissionsakal
Updated on

RTE Admission : आरटीई अंतर्गत झालेल्या मोफत प्रवेशाची प्रतिपूर्तीची सुमारे अठराशे कोटी रुपये गत चार वर्षांपासून शासनाकडून राज्यातील शाळांना मिळालेली नाही.

यात नाशिक जिल्ह्यातील मोफत प्रवेश दिलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे ८१ कोटी ६९ लाख ४ हजार ३०५ रुपयांचे अनुदान थकले आहे. या अनुदानासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने वारंवार पत्र दिलेले आहे. (82 crores owed to government for RTE admission Waiting in district for 4 years nashik news)

शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांत शासनातर्फे २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. त्या प्रवेशाच्या बदल्यात शासन संबंधित शाळांना प्रतिपूर्ती रक्कम अदा करत असते.

ही प्रतिपूर्ती रक्कम शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार दोन टप्प्यांत शैक्षणिक वर्षाच्या शेवटी देणे अभिप्रेत असते. परंतु शासनाकडे राज्यात आरटीई प्रवेशांतर्गत गेल्या सहा वर्षांची जवळपास १८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

त्यात नाशिक जिल्ह्याची मागील चार वर्षांची ८१.६९ कोटींची थकबाकी आहे. याशिवाय शासनाने कोरोना काळात २०२०-२१ व २०२१-२२ या काळात प्रतिपूर्ती दर ८ हजार रुपये केला होता. शासन स्वयंअर्थसहाय्यित शाळांना कोणतेही अनुदान देत नाही, बंधने मात्र लादते.

दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी दाखला अनिवार्य न केल्याने अनेक पालकांकडून शुल्क थकविले जाते. दुसरीकडे मोफत प्रवेशाची प्रतिपूर्ती शासन लवकर देत नाही. मग आम्ही शाळा चालवायच्या कशा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासन आरटीईची प्रतिपूर्ती शाळांना अदा करत नाही तोपर्यंत या कोट्यातून प्रवेशित बालकांच्या पालकांनी शाळेची मागील चार वर्षांचे शुल्क भरावे. ज्यावेळी शासन ते शुल्क देईल तेव्हा ती रक्कम पालकांना परत देण्यात येईल.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

RTE Admission
Nashik ZP News : जि. प. ची 200 कोटींची देयके रखडली!

अन्यथा या कोट्याअंतर्गत बालकांचे शिक्षण बंद केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याची आक्रमक भूमिका महाराष्ट्र स्टेट इंग्लिश मीडिया स्कूल असोसिएशनने घेतली आहे. त्यामुळे प्रवेश अडचणीत येऊन शुल्काचा भार पालकांवर पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

वर्षनिहाय झालेली शाळांची थकबाकी

सन-- आरटीईतंर्गत प्रवेशित विद्यार्थी-- जिल्ह्यास प्राप्त अनुदान-- झालेला खर्च-- जिल्हास्तरीय शिल्लक रक्कम-- थकीत रक्कम

२०१९-२० १४ हजार८४३ ४००७२००० ४००७२०० - १०९९७३०२३

२०२०-२१ १८ हजार ७५९ १४६५९००० १४६५९००० - १७३३७३६७२

२०२१-२२ २० हजार८६८ २३५८६००० २३५८६००० - २२५४९८६११

२०२२-२३ २१ हजार १९२ १८८८८००० १३४५०००० ५४३८००० ३०८०५८९९९

RTE Admission
Phalke Smarak : लावणी महोत्सवाचे ‘वाजले बारा’; फाळके स्मारकातील खुले नाट्यगृह बंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.