Nashik Corona Update : जुलै महिन्यात चौथ्यांदा दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या शंभरापेक्षा कमी राहिली. सोमवारी (ता.२६) जिल्ह्यात ८६ पॉझिटिव्ह आढळले. तर ११८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाल्याने, सद्यःस्थितीत जिल्ह्यात एक हजार २५३ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (86 new corona positive patients reported in district)
सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रात २६, नाशिक ग्रामीणमध्ये ५६, मालेगाव महापालिका क्षेत्रात तीन तर जिल्हा बाहेरील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चार मृतांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील तीन तर नाशिक ग्रामीण क्षेत्रातील एका मृताचा समावेश आहे.
दीर्घ कालावधीनंतर प्रलंबित अहवालांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत दोन हजार २९९ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील एक हजार ७०१, मालेगावचे ४१२, नाशिक महापालिका हद्दीतील १८६ रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात ६६८ रुग्ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ६२९ रुग्णांचा समावेश होता. जिल्हा रुग्णालयात एक रुग्ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील ३८ रुग्ण होते. तर मालेगाव महापालिका क्षेत्रात एकही संशयित रुग्ण दाखल झाला नाही.
(86 new corona positive patients reported in district)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.